मराठी बातम्या  /  क्रीडा  /  PAK vs ENG Test: डेड पीचवर इंग्लंडनं पाकिस्तानला पाजलं पाणी, शेवटच्या सत्रात पहिली कसोटी जिंकली

PAK vs ENG Test: डेड पीचवर इंग्लंडनं पाकिस्तानला पाजलं पाणी, शेवटच्या सत्रात पहिली कसोटी जिंकली

Dec 05, 2022, 05:18 PM IST

    • Pakistan vs England 1st Test highlights: बेन स्टोक्सच्या संघाने इतिहास रचला आहे. इंग्लंडने पहिली कसोटी जिंकली आहे. पाकिस्तानचा रावळपिंडी कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी ७४ धावांनी पराभव झाला आहे. 
PAK vs ENG 1st Test

Pakistan vs England 1st Test highlights: बेन स्टोक्सच्या संघाने इतिहास रचला आहे. इंग्लंडने पहिली कसोटी जिंकली आहे. पाकिस्तानचा रावळपिंडी कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी ७४ धावांनी पराभव झाला आहे.

    • Pakistan vs England 1st Test highlights: बेन स्टोक्सच्या संघाने इतिहास रचला आहे. इंग्लंडने पहिली कसोटी जिंकली आहे. पाकिस्तानचा रावळपिंडी कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी ७४ धावांनी पराभव झाला आहे. 

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना रावळपिंडी येथे खेळला गेला. या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा ७४ धावांनी पराभव केला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसापासून रावळपिंडीची पीच चर्चेत आहे. या पीचवर प्रचंड टीका झाली आहे. तसेच, अशा पिचवर सामन्याचा निकाल लागणे अशक्य असल्याचे अनेकांनी म्हटले होते. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दरम्यान, पहिल्या कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी ३४३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ पाचव्या दिवशी २६८ धावांवर गारद झाला. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी पाकिस्तानला विजयासाठी ९० षटकात २६३ धावांची गरज होती. तर इंग्लंडला विजयासाठी ८ विकेट्स घ्यायच्या होत्या.

त्यापूर्वी, इंग्लंडने आपला दुसरा डाव चौथ्या दिवशी चहापानाआधी ७ बाद २६३ धावांवर घोषित केला होता. यानंतर यानंतरच या सामन्याचा निकाल लागू शकतो, अशी शक्यता निर्माण झाली. 

इंग्लंडच्या पहिल्या डावात ६५७ धावा

दरम्यान, या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात ६५७ धावा केल्या होत्या. इंग्लिश संघाच्या ४ फलंदाजांनी शतके झळकावली. यामध्ये जॅक क्रोली (१२२), बेन डकेट (१०७), ऑली पोप (१०८) आणि हॅरी ब्रूक (१५३) यांचा समावेश आहे.

प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या ५७९ धावा

प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात ५७९ धावा केल्या. त्यांच्याकडून अब्दुल्ला शफीकने ११४, तर इमाम-उल-हकने १२१ धावा केल्या. तसेच,  कर्णधार बाबर आझमने १३६ धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे दुसऱ्या डावात इंग्लंड ७८ धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरला होता.

इंग्लंडचा दुसरा डाव २६४ धावांवर घोषित

दुसऱ्या डावात इंग्लंडने सात गड्यांच्या मोबदल्यात २६४ धावा करून डाव घोषित केला. जो रूटने ७३ आणि हॅरी ब्रूकने ८७ धावा केल्या. त्याचवेळी जॅक क्रॉलीने ५० धावा केल्या. अशाप्रकारे इंग्लिश संघाला एकूण ३४२ धावांची आघाडी मिळाली आणि संघाने पाकिस्तानसमोर ३४३ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ पाचव्या दिवशी २६८ धावांवर गारद झाला. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात सौद शकीलने सर्वाधिक ७६ धावा केल्या. तर इंग्लंडकडून दुसऱ्या डावात ओली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन यांनी प्रत्येकी ४ विकेट घेतल्या.

पुढील बातम्या