मराठी बातम्या  /  क्रीडा  /  India Vs Australia : ऑस्ट्रेलियन संघ भारतात दाखल, T20 सामन्याआधी गाळला घाम, पाहा PHOTOS

India Vs Australia : ऑस्ट्रेलियन संघ भारतात दाखल, T20 सामन्याआधी गाळला घाम, पाहा PHOTOS

Sep 18, 2022, 11:33 AM IST

    • India Vs Australia : भारताविरोधात ऑस्ट्रेलिया तीन T20 सामने खेळणार आहे. त्यासाठी ऑसी संघ भारतात दाखल झाला आहे.
india vs australia series 2022 schedule (HT)

India Vs Australia : भारताविरोधात ऑस्ट्रेलिया तीन T20 सामने खेळणार आहे. त्यासाठी ऑसी संघ भारतात दाखल झाला आहे.

    • India Vs Australia : भारताविरोधात ऑस्ट्रेलिया तीन T20 सामने खेळणार आहे. त्यासाठी ऑसी संघ भारतात दाखल झाला आहे.

india vs australia series 2022 schedule : टिम इंडिया आणि ऑस्ट्रेलियातील T20 मालिकेला परवापासून सुरुवात होत आहे. या मालिकेचा पहिला सामना मोहालीत होणार असून त्यासाठी आता ऑस्ट्रेलियन संघ भारतात दाखल झाला आहे. त्यानंतर आता सामन्याआधी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मैदानावर जोरदार घाम गाळला आहे. त्याचे फोटोही आता समोर आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाच्या या तीन सामन्यांच्या मालिकेला T20 विश्वचषकाची लिटमस टेस्ट मानली जात आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सनं इतर खेळाडूंना सोबत घेऊन सामन्याची रणनिती आखली आहे. या मालिकेआधी काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दुखापत झाली होती. त्यानंतर आता टिम डेव्हिडचा संघात समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय गेल्या अनेक महिन्यांपासून माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथची बॅट शांत आहे. त्यामुळं तो भारताविरोधात गायब असलेला फॉर्म शोधण्याचा प्रयत्न करणार आहे.

दुसरीकडे रनमशिन विराट कोहली फॉर्मात परतला आहे. आशिया कपमध्ये त्यानं पाकिस्तान, हॉंगकॉंग आणि अफगाणिस्तानविरोधात जोरदार बॅटिंग केली होती. त्यात एका ऐतिहासिक शतकाचाही समावेश आहे. त्यामुळं आता कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत असे दिग्गज फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर तुटून पडताना दिसतील.

२० सप्टेंबरला होणाऱ्या T20 सामन्याआधी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला कोरोना झाल्यानं भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी कुणाला संधी येणार हे अजून बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यामुळं आता ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजांना चित करण्यासाठी आणखी कोणत्या वेगवान गोलंदाजांना संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.