मराठी बातम्या  /  क्रीडा  /  India vs Australia : कोहली मोडणार द्रविडचा विक्रम; रोहितला मागे टाकून T20 किंग होण्याची संधी

India vs Australia : कोहली मोडणार द्रविडचा विक्रम; रोहितला मागे टाकून T20 किंग होण्याची संधी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 17, 2022 02:37 PM IST

India vs Australia Series 2022 : T20 विश्वचषकाआधी भारत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरोधात तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यात विराट कोहलीला आणखी एक मोठा विक्रम रचण्याची संधी असेल.

India vs Australia Series 2022
India vs Australia Series 2022 (AP)

India vs Australia Series 2022 : गेल्या तीन वर्षांपासून आऊट ऑफ फॉर्म राहिलेल्या विराट कोहलीची बॅट आशिया कप स्पर्धेत चांगलीच तळपल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा हा T20 विश्वचषक स्पर्धेची लिटमस टेस्ट मानली जात आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी तीन सामने खेळणार आहे. त्यात आता विराट कोहलीला दोन विक्रम करून इतिहास रचण्याची संधी आहे. जर रनमशिन कोहलीनं या दौऱ्यांतही धावा केल्या तर तो द्रविड आणि कर्णधार रोहित शर्माच्या रेकॉर्डला तोडून T20 चा नवा किंग बनू शकतो.

कोहली कसा जाईल द्रविडच्या पुढे?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली सातव्या (२४००२) स्थानावर आहे. तर द्रविड २४२०८ धावांसह सहाव्या स्थानी आहे. त्यामुळं जर विराट कोहलीनं या सिरिजमध्ये २०७ धावा केल्या तर तो द्रविडला मागे टाकून सहावं स्थानी विराजमान होणार आहे.

त्याचबरोबर T20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या एकूण १०९०८ धाा झाल्या आहेत. म्हणजे त्याला ११ हजार धावा पूर्ण करण्यासाठी केवळ ९२ धावांची गरज आहे. जर या सिरिजमध्ये त्यानं हा पल्ला गाठला तर तो भारताकडून T20 मध्ये ११ हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल. तर दुसरीकडे रोहित शर्मानंही T20 मध्ये १०४७० धावा केल्या आहेत.

त्यामुळं रोहितला मागे टाकून मोठा इतिहास रचण्याची मोठी संधी विराट कोहलीला असणार आहे. सध्या T20 करियरमध्ये ख्रिस गेल १४५६२ धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर शोएब मलिक दुसऱ्या (११८९३) आणि कायरन पोलार्ड (११८२९) तिसऱ्या स्थानी आहेत. त्यानंतर कोहली चौथ्या स्थानी आहे.

WhatsApp channel