मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : विद्यापीठातल्या ६० मुलींचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल; विद्यार्थी आक्रमक, पंजाबमध्ये राडा

Viral Video : विद्यापीठातल्या ६० मुलींचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल; विद्यार्थी आक्रमक, पंजाबमध्ये राडा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 18, 2022 10:44 AM IST

Viral Video On Social Media : विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये अंघोळ करत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं देशात खळबळ उडाली आहे. त्यामुळं आठ विद्यार्थींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

Mohali University Viral Video
Mohali University Viral Video (HT)

Mohali University Viral Video : विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये अंघोळ करत असलेल्या साठ मुलींचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. हॉस्टेलमधीलच एका विद्यार्थीनं साठ मुलींचा व्हिडिओ तयार केला असून त्याला सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. पंजाबमधील मोहालीस्थित चंदीगड विद्यापीठातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगड विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीनं हॉस्टेलमधील साठ मुलींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट केला, त्यानंतर तिनं शिमल्यात राहाणाऱ्या एका मित्राला तो व्हिडिओ पाठवला. त्यानं तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विद्यापीठातील आठ विद्यार्थीनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्यातल्या एका विद्यार्थीनीची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळत आहे.

आरोपी विद्यार्थीनी गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठाच्या हॉस्टेलमधील मुली अंघोळ करत असल्याचे व्हिडिओ शूट करत होती. हा प्रकार हॉस्टेलच्या काही मुलींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिच्याविरोधात विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली. परंतु घडलं उलटंच. विद्यापीठ प्रशासनानं या प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही, परंतु या प्रकरणाची कुणालाही माहिती न देण्याचा ताकीद दिली. त्यानंतर हादरलेल्या काही पीडित मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला आहे.

या घटना समोर आल्यानंतर आणि मुलींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं लक्षात आल्यानंतर विद्यार्थी संघटना विद्यापीठ प्रशासनाविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विद्यार्थ्यांनी या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन केलं आहे. याशिवाय पोलीस आणि विद्यार्थी संघटनांमध्ये या प्रकरणावरून संघर्ष झाल्याचं वृत्त आहे.

IPL_Entry_Point

विभाग