मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Australian Cricket Team : वॉर्नर आणि स्मिथला कॅप्टन बनवू नका; मिशेल जॉन्सनचा क्रिकेट बोर्डाला सल्ला

Australian Cricket Team : वॉर्नर आणि स्मिथला कॅप्टन बनवू नका; मिशेल जॉन्सनचा क्रिकेट बोर्डाला सल्ला

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 17, 2022 02:34 PM IST

Australian Cricket Team Captain : फिंचनं निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट टिमचा पुढचा कर्णधार कोण असणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

Australian Cricket Team Captain
Australian Cricket Team Captain (HT)

Australian Cricket Team Captain : ऑस्ट्रेलियन सलामीवीर फलंदाज आणि कर्णधार अॅरॉन फिंच यानं क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता पुढचा ऑस्ट्रेलियन कर्णधार कोण असणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. फिंच निवृत्त झाल्यानंतर सध्या वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. परंतु आता वॉर्नर आणि स्मिथनं टिमला मार्गदर्शन करायला हवं, जर त्यातल्या कुणाला कॅप्टन केलं तर पुन्हा बॉल टेम्परिंग प्रकरणाची चर्चा होईल, असं म्हणत माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सननं वॉर्नर किंवा स्मिथला कर्णधार करण्याला विरोध केला आहे.

याबाबत जॉन्सन माध्यमांशी बोलताना म्हणाला की, स्मिथ आणि वॉर्नर हे त्याच्या करियरच्या शेवटच्या टप्प्यात आहेत, अशा वेळी आता एखाद्या युवा खेळाडूच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं सोपवायला हवी, असं म्हणत त्यानं वॉर्नर आणि स्मिथच्या कर्णधारपदाला विरोध केला आहे.

वेगवान गोलंदाज असलेल्या पॅट कमिन्सकडे तिन्ही फॉर्मॅटचं कर्णधारपद देण्यात आल्यानं त्याची जबाबदारी फार वाढली आहे. त्यामुळं निवड समितीपुढे ग्लेन मॅक्सवेलचं नाव असल्याचं मी ऐकलं. परंतु भविष्याचा विचार करत कॅमरून ग्रीनला कर्णधार करणं हा चांगला पर्याय ठरू शकतो. याशिवाय ट्रॅव्हिस हेडनं जर त्याच्या कामगिरीत सातत्य दाखवलं तर त्यालाही कर्णधार करण्यात काहीही गैर नाही, असं मिशेल जॉन्सन म्हणाला.

दरम्यान आता आशिया कप स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियात तीन सामन्यांची T20 मालिका खेळण्यात येणार आहे. त्यामुळं आता दोन्ही संघ विश्वचषकाआधी ही मालिका जिंकून दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्नात असतील.

WhatsApp channel