मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2022 : 26 परदेशी खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार, ही आहे संपूर्ण यादी

IPL 2022 : 26 परदेशी खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार, ही आहे संपूर्ण यादी

Mar 14, 2022, 05:30 PM IST

  • 26 मार्चपासून सुरू होणाऱ्या आईपीएल 2022 च्या आधीच लीगमधील फ्रेंचाइजी व क्रिकेटप्रेमींसाठी एक निराशाजनक बातमी आहे. वेगवेगळ्या मालिकांमधून आपल्या राष्ट्रीय संघांकडून खेळणारे तब्बल २६ परदेशी खेळाडू आयपीएल १५ मधील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहेत. 

आयपीएल २०२२ (HT)

26मार्चपासून सुरू होणाऱ्या आईपीएल2022च्या आधीच लीगमधील फ्रेंचाइजी व क्रिकेटप्रेमींसाठी एक निराशाजनक बातमी आहे. वेगवेगळ्या मालिकांमधून आपल्या राष्ट्रीय संघांकडून खेळणारे तब्बल २६ परदेशी खेळाडू आयपीएल १५ मधील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहेत.

  • 26 मार्चपासून सुरू होणाऱ्या आईपीएल 2022 च्या आधीच लीगमधील फ्रेंचाइजी व क्रिकेटप्रेमींसाठी एक निराशाजनक बातमी आहे. वेगवेगळ्या मालिकांमधून आपल्या राष्ट्रीय संघांकडून खेळणारे तब्बल २६ परदेशी खेळाडू आयपीएल १५ मधील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहेत. 

overseas players set to miss first week of IPL 2022 - 26 मार्चपासून सुरू होणाऱ्या आईपीएल 2022 च्या आधीच लीगमधील फ्रेंचाइजी व क्रिकेटप्रेमींसाठी एक निराशाजनक बातमी आहे. आयपीएलचा यंदाचा 15 वा सीझन खूपच धमाकेदार होणार आहे, कारण यामध्ये एकूण १० संघ सामील होणार आहेत. आयपीएल (Indian Premier League) मधील या १० संघांमध्ये अनेक परदेशी व विस्फोट फलंदाज सामील आहेत. दरम्यान आयपीएलचा यंदाचा सीझन सुरु होण्यापूर्वीच काहीशी वाईट बातमी आहे की, जवळपास २६ परदेशी खेळाडू सुरुवातीचे काही सामने खेळणार नाहीत. आयपीएल 2022 च्या काळात तीन आंतरराष्ट्रीय मालिका खेळविण्यात येणार आहेत. या कारणामुळे जवळपास 26 परदेशी खेळाडू आपल्या संघाकडून सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाहीत. 

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

 

या तीन मालिकांमध्ये वेस्टइंडीज विरुद्ध इंग्लंड, पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांग्लादेश या संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या मालिका सामील आहेत. वेस्टइंडीज–इंग्लंड सीरीज 28 मार्च रोजी, पाकिस्तान–ऑस्ट्रेलिया मालिका 5 एप्रिल रोजी आणि दक्षिण आफ्रिका–बांग्लादेश मालिका 12 एप्रिल रोजी संपणार आहेत. इनसाइड स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार या मालिकांमध्ये खेळणारे खेळाडू आयपीएल 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यात खेळू शकणार नाहीत. तर जाणून घेऊया की, कोणत्या टीमचे परदेशी खेळाडू आयपीएल-15 च्या सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर राहू शकतात. 

दिल्ली कॅपिटल्स संघात बांग्लादेशचा जलदगती गोलंदाज मुस्तफिजुर रहमान, दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नर सारखे खेळाडू सामील आहेत. वॉर्नर 30 मार्च रोजी शेन वॉर्नच्या अंतिम संस्कार कार्यक्रमात सामील झाल्यानंतर ५ एप्रिलपर्यंत भारतात दाखल होईल. लखनौ सुपर जायंट्स संघात मार्कस स्टोयनिस, जेसन होल्डर, काइल मेयर्स, मार्क वुड आणि क्विंटन डिकॉक सारखे परदेशी खेळाडू आहेत व ते आपल्या राष्ट्रीय संघाकडून खेळल्यानंतर आयपीएलमध्ये उतरतील. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्समध्ये दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर ड्वेन प्रिटोरियस बांग्लादेशविरुद्ध वनडे सीरीज खेळल्यानंतर टीममध्ये सामील होईल. 

 

त्याशिवाय दोन वेळा चँपियन राहिलेल्या कोलकाता नाइट राइडर्स संघात एरॉन फिंच आणि पॅट कमिंस पाकिस्तान विरुद्ध 5 एप्रिल रोजी मालिका संपल्यानंतर संघात सामील होतील. राजस्थान रॉयल्स संघाला सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचा रासी वेन व डेर डुसेन यांची कमतरता भासेल. सनराइजर्स हैदराबाद मध्ये सामील असलेले सीन एबॉट, मार्को यानसेन आणि एडेन मार्करम ही आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात संघाचा भाग नसतील. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर मध्ये सामील ग्लेन मॅक्सवेल, जेसन बेहरेनडॉर्फ आणि जोश हेजलवुड ही सुरूवातीच्या सामन्यात संघाबाहेर असतील.