मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2022: वानखेडे स्टेडियमवर एकही सामना खेळणार नाही मुंबई इंडियन्स !

IPL 2022: वानखेडे स्टेडियमवर एकही सामना खेळणार नाही मुंबई इंडियन्स !

Feb 25, 2022, 12:43 PM IST

  • बीसीसीआयने जाहीर केले आहे की, आयपीएल 2022 चे सामने मुंबईमधील तीन तर पुण्यातील एका स्टेडियमवर खेळवले जातील. मात्र आयपीएलमधील बलाढ्य संघ असणारा व घरच्या मैदानावर विजयी परंपरा कायम राखणारा मुंबई इंडियन्स संघ यंदा मुंबईत आपला एकही सामना न खेळता पुण्यात खेळणार आहे.

संग्रहित छायाचित्र (HT)

बीसीसीआयने जाहीर केले आहे की,आयपीएल2022चे सामने मुंबईमधील तीन तरपुण्यातीलएका स्टेडियमवर खेळवले जातील. मात्र आयपीएलमधील बलाढ्य संघ असणारा व घरच्या मैदानावर विजयी परंपरा कायम राखणारा मुंबई इंडियन्स संघ यंदा मुंबईत आपला एकही सामना न खेळता पुण्यात खेळणार आहे.

  • बीसीसीआयने जाहीर केले आहे की, आयपीएल 2022 चे सामने मुंबईमधील तीन तर पुण्यातील एका स्टेडियमवर खेळवले जातील. मात्र आयपीएलमधील बलाढ्य संघ असणारा व घरच्या मैदानावर विजयी परंपरा कायम राखणारा मुंबई इंडियन्स संघ यंदा मुंबईत आपला एकही सामना न खेळता पुण्यात खेळणार आहे.

मुंबई – बीसीसीआयने जाहीर केले आहे की, आयपीएल 2022 चे सामने मुंबईमधील तीन तर पुण्यातील एका स्टेडियमवर खेळवले जातील. मार्चअखेर सुरु होणाऱ्या यंदाच्या आयपीएलबाबत काही संघांनी मुंबई इंडियन्सविषयी तक्रार केली होती की, मुंबईत सामने खेळवले गेल्याने मुंबई इंडियन्स संघाला होम ॲडवान्टेज मिळेल.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

मुंबईतील वानखेडे मैदान मुंबई इंडियन्सचे घरचे मैदान आहे आणि अशावेळी मुंबई एकमेव संघ असेल की, त्यांना आपल्या यजमानपदात खेळण्याची संघी मिळेल. यामुळे काही आयपीएल फ्रेंचाइजींनी हरकत घेतली होती. दरम्यान बीसीसीआने याबाबत स्पष्ट केले आहे की, मुंबई इंडियन्स संघाला त्यांच्या होम ग्राउंडचे ॲडवान्टेंज मिळणार नाही कारण रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा संघ आपले सर्व सामने पुण्यात खेळेल. 

 

बीसीसीआय आणि आयपीएलच्या गवर्निंग काउंसिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्ट्सशी बातचीत करताना म्हटले की, मुंबई इंडियन्स संघ मुंबईत नाही तर पुण्यामध्ये आपले सर्व सामने खेळेल. आम्ही सर्वांना समान संधी व समर्थन असणारे मैदान दिले आहेत. मुंबई इंडियन्स संघाला मुंबईत खेळण्यासाठी विरोध करणाऱ्या फ्रेंचाइजीची मला माहिती नाही. हे केवळ मीडिया रिपोर्ट्स होते. जर आमच्याकडे कोणती तक्रार किंवा अधिकृत हरकत दाखल झाली तर आम्ही याबाबत विचार करू. 

मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉन स्टेडियम आणि नवी मुंबईतील डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचे सामने होणार आहेत. त्याचबरोबर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवरही आयपीएल 2022 चे सामने खेळवण्यात येणार आहेत. परिणामी, अन्य फ्रेंचाइजींनी मुंबई इंडियन्स संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर खेळण्याविषयी बीसीसीआयकडे तक्रार दाखल केली होती. टूर्नामेंटच्या मागील सीझनमध्ये कोणत्याही संघाला होम ग्राऊंडवर खेळण्याची संघी मिळाली नव्हती. कारण कोरोना परिस्थितीतमुळे सर्व संघांना वेगवेगळ्या मैदानांवर सामने खेळावे  लागले होते. 

क्रिकबजनुसार, मुंबईतील तीन मैदानांवर एकूण 55 सामने खेळवले जातील तर यंदा पुण्यात १५ सामने खळविण्यात येणार आहेत. आयपीएल २०२२ मधील सर्व १० संघ ब्रेबॉर्न स्टेडियम आणि पुण्यात तीन-तीन सामने खेळतील, तर वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर प्रत्येक संघ चार-चार सामने खेळणार आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स यावेळी एकमेव फ्रेंचाइजी असेल जी आपले चार सामने वानखेडे स्टेडियमवर खेळणार होती, मात्र आता हे सामने पुण्यात हलविण्यात आले आहेत. 

पुढील बातम्या