मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2022 : महाराष्ट्रात २६ मार्चपासून सामन्यांना सुरुवात, ४०% प्रेक्षकमर्यादा

IPL 2022 : महाराष्ट्रात २६ मार्चपासून सामन्यांना सुरुवात, ४०% प्रेक्षकमर्यादा

Feb 25, 2022, 01:14 PM IST

  •  इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) २०२२ च्या हंगामाला येत्या २६ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. कोरोना परिस्थितीमुळे यंदा देशभरातील निवडक मैदानांवर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

आयपीएल २०२२ (ht)

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) २०२२ च्या हंगामाला येत्या २६ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. कोरोना परिस्थितीमुळे यंदा देशभरातील निवडक मैदानांवर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

  •  इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) २०२२ च्या हंगामाला येत्या २६ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. कोरोना परिस्थितीमुळे यंदा देशभरातील निवडक मैदानांवर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

मुंबई - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) २०२२ च्या हंगामाला येत्या २६ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. कोरोना परिस्थितीमुळे यंदा देशभरातील निवडक मैदानांवर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. आयपीएलचे साखळी सामने महाराष्ट्रातील चार मैदानांवर खेळवण्यात येणार आहेत. सुरुवातीच्या सामन्यांसाठी ४० टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २९ मे रोजी होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

आयपीएल २०२२ मध्ये १० संघांचा समावेश करण्यात आलेला असून या मनोरंजनाचा खजिना असलेला क्रिकेटचा हा मेगा इव्हेंट शनिवार, २६ मार्चपासून सुरु होत असल्याची माहिती आयपीएलच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर आयपीएलचे प्रमुख ब्रिजेश पटेल यांनी दिली.

यंदाच्या सीझनमध्ये लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आल्यामुळे ‘आयपीएल’मधील सामन्यांची संख्या ७४ झाली आहे. ‘आयपीएल’चे सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियमसह नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम आणि पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. एकूण ७४ सामन्यांपैकी यंदा मुंबईत ५५ तर पुण्यात १५ सामने खेळविले जाणार आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सुरुवातीच्या सामन्यांना ४० टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोना साथ आणखी नियंत्रणात आल्यास १०० टक्के प्रेक्षकांनाही सामने पाहता येऊ शकतील, अशी आशा बीसीसीआयने व्यक्त केली आहे. 

साखळी सामन्याची ठिकाणे निश्चित झाली आहेत मात्र बाद फेरीच्या सामन्यांच्या ठिकाणांबाबत कोणताही निर्णय अद्याप झाला नाही. तरी जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असणारे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिमयवर यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुढील बातम्या