मराठी बातम्या  /  धर्म  /  Papmochani Ekadashi : पापमोचनी एकादशी घेऊन येत आहे 'हे' चार शुभ योग

Papmochani Ekadashi : पापमोचनी एकादशी घेऊन येत आहे 'हे' चार शुभ योग

Mar 16, 2023, 09:18 AM IST

  • Shubh Yoga On Papmochani Ekadashi 2023 : नावाप्रमाणेच केलेल्या सर्व पापांपासून मुक्ती मिळवण्याचा हा एक मार्ग आहे. पापांचं मोचन अर्थात पापांची क्षमा मागून त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी केलेलं व्रत किंवा संकल्प म्हणजे पापमोचनी एकादशी.

पापमोचनी एकादशी (हिंदुस्तान टाइम्स)

Shubh Yoga On Papmochani Ekadashi 2023 : नावाप्रमाणेच केलेल्या सर्व पापांपासून मुक्ती मिळवण्याचा हा एक मार्ग आहे. पापांचं मोचन अर्थात पापांची क्षमा मागून त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी केलेलं व्रत किंवा संकल्प म्हणजे पापमोचनी एकादशी.

  • Shubh Yoga On Papmochani Ekadashi 2023 : नावाप्रमाणेच केलेल्या सर्व पापांपासून मुक्ती मिळवण्याचा हा एक मार्ग आहे. पापांचं मोचन अर्थात पापांची क्षमा मागून त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी केलेलं व्रत किंवा संकल्प म्हणजे पापमोचनी एकादशी.

पापमोचनी एकादशी फाल्गुन कृष्ण ११ या दिवशी येत्या शनिवारी म्हणजेच १८ मार्च २०२३ रोजी साजरी करणार आहोत. नावाप्रमाणेच केलेल्या सर्व पापांपासून मुक्ती मिळवण्याचा हा एक मार्ग आहे. पापांचं मोचन अर्थात पापांची क्षमा मागून त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी केलेलं व्रत किंवा संकल्प म्हणजे पापमोचनी एकादशी. येत्या शनिवारी होणारी ही एकादशी चार शुभ योग घेऊन येत आहे त्यामुळे, या एकादशीचं महत्व आणखीनच वाढलं आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Jadu Tona Tips : तुमच्यावर कोणी जादूटोणा केला आहे का ते कसं ओळखणार? हे संकेत सांगतील, वाचा

Chardham Yatra 2024 : चारधाममध्ये कोणत्या देवी-देवतांची पूजा केली जाते? जाणून घ्या

Shani Jayanti 2024 : शनि जयंतीला करा हे उपाय, सर्व अडचणी दूर होतील

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही या वस्तू खरेदी करू नका, नाहीतर आयुष्यभर घरात दारिद्र्य राहील

पापमोचनी एकादशीच्या दिवशी निर्जल व्रत ठेवावं किंवा फलाहार करावा. पुराणानुसार एकादशीला भगवान श्रीविष्णू यांचं स्वरूप मानलं गेलं आहे. श्रीविष्णू या पृथ्वीचे पालनकर्ता आहेत. या ब्रम्हांडाचे नायक आहेत. त्यामुले पापमोचनी एकादशीच्या दिवशी उपवास करुन श्रीविष्णूंना शरण गेल्यास ब्रम्हहत्येच्या पापापासूनही सुटका मिळते, इतकं या एकादशीला महत्वाचं मानलं गेलं आहे.

 पापमोचनी एकादशीची तारीख आणि शुभ मुहूर्त कोणते

हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीची तारीख शुक्रवार, १७ मार्च रोजी दुपारी २.०६ पासून सुरू होत आहे आणि ही तिथी शनिवार १८ मार्च रोजी सकाळी ११.१३ पर्यंत वैध असेल. उदयतिथीच्या निमित्ताने १८ मार्च रोजी पापमोचनी एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे

पापमोचनी एकादशीला बनत आहेत हे शुभ योग

द्विपुष्कर योग - १९ मार्च २०२३, सकाळी १२.२९ - सकाळी ०६.२७ 

सर्वार्थ सिद्धी योग - १८ मार्च २०२३, सकाळी ०६.२८ - १९ मार्च, सकाळी १२.२९

शिवयोग - १७ मार्च, सकाळी ०३.३३ - १८ मार्च, रात्री ११.५४

पापमोचनी एकादशीच्या दिवशी म्हणायचे मंत्र

ॐ नमो भगवते वासुदेवाय

ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।

ॐ विष्णवे नम:

ॐ हूं विष्णवे नम:

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा