मराठी बातम्या  /  धर्म  /  Vasant Panchami : कोणत्या कारणाने झाली देवी सरस्वतीची उत्पत्ती?, का केली जाते सरस्वती पूजा?

Vasant Panchami : कोणत्या कारणाने झाली देवी सरस्वतीची उत्पत्ती?, का केली जाते सरस्वती पूजा?

Jan 24, 2023, 12:07 PM IST

  • Vasant Panchami Devi Saraswati Katha : देवी सरस्वतीची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी का केली जाते. त्यामागची कहाणी काय आहे.

देवी सरस्वती (हिंदुस्तान टाइम्स)

Vasant Panchami Devi Saraswati Katha : देवी सरस्वतीची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी का केली जाते. त्यामागची कहाणी काय आहे.

  • Vasant Panchami Devi Saraswati Katha : देवी सरस्वतीची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी का केली जाते. त्यामागची कहाणी काय आहे.

वसंत पंचमी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते. ज्ञानाचा आशिर्वाद देवी सरस्वतीकडून मागितला जातो. मात्र देवी सरस्वतीची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी का केली जाते. त्यामागची कहाणी काय आहे. चला तर मग आज जाणून घेऊया काय आहे यामागची कहाणी.

ट्रेंडिंग न्यूज

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया कधी आहे? सोनं खरेदी करण्याची ही शुभ वेळ नोंद करून ठेवा

Marriage Mantra : मुलींच्या लग्नासाठी सर्वात प्रभावी मंत्र, मुलांची रांग लागेल, एकदा आजमावून पाहा

Mangalsutra : सौभाग्याचं प्रतीक मंगळसुत्र घालण्याची परंपरा कधी आणि कशी सुरू झाली? जाणून घ्या

Rashtrasant Tukdoji Maharaj Jayanti : आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती, वाचा त्यांचा जीवन प्रवास

एकदा ब्रम्हदेव पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत होते. प्रदक्षिणा करतानाच ते एका ठिकाणी थांबले. त्यांनी पाहिलं की पृथ्वीवर माणसं,प्राणी आहेत. मात्र ते मूक आहेत. ब्रम्हदेवांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या कमंडलूमधून थोडं पाणी घेतलं. त्यावर मंत्रोच्चार केले आणि ते पाणी शिंपडलं असता एका दिव्य तेजातून एक देवी प्रकट झाली. ती देवी म्हणजे सरस्वती देवी.

देवीने प्रकट होताच ब्रम्हदेवांना नमस्कार करत विचारलं की “माझ्यासाठी काय आज्ञा आहे प्रभू?”. ब्रम्हदेवांनी देवीला सांगितलं की, “या पृथ्वीतलावर सारं काही मूक आहे. म्हणजेच सर्व सजीव वावरत तर आहेत पण त्यांना एकमेकांशी संवाद साधायला भाषा नाही. देवी तू तुझ्या विणेतून या मूक वातावरणात संगीत निर्माण कर आणि शब्द निर्माण कर ज्यामुळे हे सजीव एकमेकांशी बोलू शकतील,एकमेकांशी संवाद साधू शकतील”.

त्यानंतर ब्रम्हदेवांची आज्ञा मानून सरस्वती देवीने या विश्वात स्वर आणि उच्चार निर्माण केले. त्यामुळेच देवी सरस्वतीचा हा प्रकट दिवस साजरा केला जातो. या दिवसाला वसंत पंचमी असंही म्हणतात.

वसंत पंचमीच्या दिवशी काय करावे

आपण रोज ऑफिसमध्ये, शाळेत किंवा इतर ठिकाणी जिथे विद्याभ्यास करतो त्या सर्व वह्यांना किंवा पुस्तकांना अगदी आजच्या जमान्यातल्या लॅपटॉपलाही फुले वाहावीत आणि नमस्कार करावा. देवी सरस्वतीकडे ज्ञानाचा आशिर्वाद मागावा.

 

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा