मराठी बातम्या  /  धर्म  /  Ganesh Jayanti : गणरायांची सोंड नेमकी कोणत्या दिशेला असावी?

Ganesh Jayanti : गणरायांची सोंड नेमकी कोणत्या दिशेला असावी?

Jan 24, 2023, 10:26 AM IST

  • Vinayak Chaturthi 2023 : गणराय घरी विराजमान करताना त्यांची सोंड नेमकी कोणत्या दिशेला असावी असा प्रश्न अनेकांना पडतो.

गणरायांची सोंड कोणत्या दिशेला असावी (हिंदुस्तान टाइम्स)

Vinayak Chaturthi 2023 : गणराय घरी विराजमान करताना त्यांची सोंड नेमकी कोणत्या दिशेला असावी असा प्रश्न अनेकांना पडतो.

  • Vinayak Chaturthi 2023 : गणराय घरी विराजमान करताना त्यांची सोंड नेमकी कोणत्या दिशेला असावी असा प्रश्न अनेकांना पडतो.

श्रीगणेश जयंती आपण साजरी करणार आहोत. अनेकांच्या घरी हा माघी गणेश विराजमान होत आहे. अशात गणरायांची मूर्ती स्थापित करताना त्यांची सोंड कोणत्या बाजूला आहे याकडे खास लक्ष दिलं जातं. गणरायांची सोंड उजव्या बाजूला असल्यास त्याला जागृत गणपती असं म्हटलं जातं. असे गणराय अत्यंत कडक असतात असंही म्हटलं जातं. मग गणराय घरी विराजमान करताना त्यांची सोंड नेमकी कोणत्या दिशेला असावी असा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर मग सोंडेची दिशा आणि त्याचं महत्व इथे जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही या वस्तू खरेदी करू नका, नाहीतर आयुष्यभर घरात दारिद्र्य राहील

Ganga Saptami 2024 : यंदा गंगा सप्तमी कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Varuthini Ekadashi 2024 : काय आहे वरुथिनी एकादशीचे महत्त्व? कशी मिळते पापातून मुक्ती? वाचा संपूर्ण कथा

Festival List May 2024 : मे महिन्यातील सण-उत्सव, जयंतीची संपूर्ण यादी; जाणून घ्या तारीख, वार आणि महत्व

उजव्या बाजूला सोंड असल्यास

सामान्यतः उजव्या हाताची सोंड असलेल्या गणेशाची पूजा तंत्र पद्धतीने केली जाते. हे गणपती देवळांमध्ये स्थापित केले जातात. दक्षिण दिशेला यमलोक आहे, जिथे पाप-पुण्य यांचा लेखाजोखा ठेवला जातो. म्हणूनच ते अप्रिय मानले जाते.

कोणत्या दिशेला असावी सोंड

काही मूर्तींमध्ये गणेशाची सोंड डाव्या बाजूला तर काहींमध्ये उजव्या बाजूला असलेली पाहायला मिळते. गणेशाच्या बहुतेक मूर्ती सरळ किंवा उत्तरेकडे सोंड असलेल्या असतात. असे मानले जाते की जेव्हा गणेशाची मूर्ती दक्षिणेकडे झुकलेली बनवली जाते तेव्हा ती भंगते. असे म्हटले जाते की जर तुम्हाला दक्षिणावर्ती मूर्ती सापडली आणि तिची नीट पूजा केली तर तुम्हाला अपेक्षित फळ मिळते. गणपतीच्या डाव्या सोंडेवर चंद्राचा आणि उजव्या सोंडेवर सूर्याचा प्रभाव असतो असे मानले जाते.

कोणत्या दिशेची सोंड काय दर्शवते

सोंड उजवीकडे वळली की त्यावर पिंगळा वाणी आणि सूर्याचा प्रभाव असल्याचे मानले जाते. अशा मूर्तीची पूजा अडथळ्यांचा नाश, शत्रूंचा पराभव, विजय प्राप्ती, भयंकर आणि सामर्थ्याचे प्रदर्शन अशा कार्यांसाठी फलदायी मानली जाते. 

दुसरीकडे, डावीकडे वाकलेली सोंड असलेली मूर्ती इडा नाडी आणि चंद्रामुळे प्रभावित मानली जाते. अशी मूर्ती कायमस्वरूपी कामांसाठी पूजली जाते. जसे शिक्षण, संपत्ती, व्यवसाय, प्रगती, अपत्य सुख, विवाह, सर्जनशील कार्य आणि कौटुंबिक आनंद.

सरळ सोंड असलेल्या मूर्तीला सुशुम्र स्वार मानले जाते आणि तिची पूजा रिद्धी-सिद्धी, कुंडलिनी जागृती, मोक्ष, समाधी इत्यादीसाठी सर्वोत्तम मानली जाते. संत समाज अशाच मूर्तीची पूजा करतो, सिद्धी विनायक मंदिरात उजव्या बाजूला सोंड असलेली मूर्ती आहे.

ज्या मूर्तीमध्ये सोंड उजव्या बाजूला असते तिला दक्षिणा मूर्ती म्हणतात. यमलोकाकडे जाणारी उजवी बाजू ही सूर्याच्या नाडीची उजवी बाजू आहे, जो यमलोकाच्या दिशेचा सामना करु शकतो तो शक्तिशाली आहे. या दोन्ही अर्थाने उजव्या सोंडेच्या गणपतीला जागृत म्हणतात.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा