मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  National Girl Child Day : ‘ती’ च्या स्वप्नांना बळ देण्याचा आजचा दिवस…राष्ट्रीय बालिका दिन

National Girl Child Day : ‘ती’ च्या स्वप्नांना बळ देण्याचा आजचा दिवस…राष्ट्रीय बालिका दिन

Jan 24, 2023, 10:41 AM IST

  • 24 January 2023 Dinvishesh : मुलींना भेडसावणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि त्या समस्यांना कशा प्रकारे सोडवलं जाईल यासाठी आवश्यक उपाययोजना कशा केल्या जातील यासाठी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जाऊ लागला.

राष्ट्रीय बालिका दिन (हिंदुस्तान टाइम्स)

24 January 2023 Dinvishesh : मुलींना भेडसावणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि त्या समस्यांना कशा प्रकारे सोडवलं जाईल यासाठी आवश्यक उपाययोजना कशा केल्या जातील यासाठी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जाऊ लागला.

  • 24 January 2023 Dinvishesh : मुलींना भेडसावणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि त्या समस्यांना कशा प्रकारे सोडवलं जाईल यासाठी आवश्यक उपाययोजना कशा केल्या जातील यासाठी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जाऊ लागला.

National Girl Child Day 24 January 2023

ट्रेंडिंग न्यूज

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

Viral News: पोटच्या ३ वर्षाच्या मुलीला कारमध्येच विसरले; २ तासानंतर पालकांच्या लक्षात आलं, तोपर्यंत…

Madhavi Raje Scandia : राजमाता माधवी राजे सिंधिया यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, अनेक नेते उपस्थित

भारतात दरवर्षी २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. साल २००८ मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि भारत सरकार यांनी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यास सुरुवात केली. यावर्षी देश १५ वा राष्ट्रीय बालिका दिन २०२३ साजरा करत आहे. समाजात आणि विविध क्षेत्रात मुलींना भेडसावणाऱ्या असमानता, भेदभाव आणि शोषणाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय बालिका दिनाचा इतिहास, महत्त्व आणि इतर माहिती जाणून घेऊया.

राष्ट्रीय बालिका दिन का साजरा केला जातो

२४ जानेवारी २०२३ रोजी, भारतात १५ वा राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जाईल. राष्ट्रीय बालिका दिन महत्त्वाचा आहे कारण तो आपल्या समाजात मुलींच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करतो. हा दिवस भारतातील प्रचलित असमानता आणि मुलींवरील भेदभावाचे कठोर वास्तव प्रतिबिंबित करतो. हा दिवस देशातील मुलींना भेडसावणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी अपेक्षित असलेल्या कृतींवर लक्ष केंद्रित करतो.

राष्ट्रीय बालिका दिनाचा काय आहे इतिहास

साल २००८ मध्ये, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने मुलीसाठी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याची सुरुवात केली. भारतीय समाजात मुलींना भेडसावणाऱ्या असमानतेबद्दल जनजागृती करण्यासाठी या दिवसाची सुरुवात करण्यात आली. मुलीला शिक्षण, नोकरी, कपडे आणि इतर अनेक बाबतीत ज्या असमानतेचा सामना करावा लागतो त्याबद्दल जागरुकता वाढवण्याचे आवाहन हा दिवस आहे.

राष्ट्रीय बालिका दिन २४ जानेवारी रोजीच का साजरा केला जातो

देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गिय इंदिरा गांधी यांना आयर्न लेडी या नावाने भारतात ओळखलं जातं. इंदिरा गांधी अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान तर होत्याच मात्र आपल्या निर्णयक्षमतेने त्यांनी भल्याभल्यांना घाम फोडला होता. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून देशाची सूत्र पहिल्यांदा हाती घेतली तो दिवस होता २४ जानेवारी. राष्ट्रीय बालिका दिन नारी शक्तीची एक जाज्वल्य ओळख म्हणून इंदिराजींना समप्रित आहे. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून २४ जानेवारी रोजी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विभाग

पुढील बातम्या