मराठी बातम्या  /  धर्म  /  Putrada Ekadashi 2023 : पौष पुत्रदा एकादशी आज, कोणते आहेत शुभ मुहूर्त,कशी कराल पूजा

Putrada Ekadashi 2023 : पौष पुत्रदा एकादशी आज, कोणते आहेत शुभ मुहूर्त,कशी कराल पूजा

Jan 02, 2023, 07:37 AM IST

  • Shubh Muhurta & Pooja Vidhi Of Putrada Ekadashi : आज नववर्षातली पहिली एकादशी आहे. पुत्रदा एकादशी म्हणजे काय. कशी करावी पुत्रदा एकादशीची पूजा. वाचा सविस्तर

पुत्रदा एकादशी (हिंदुस्तान टाइम्स)

Shubh Muhurta & Pooja Vidhi Of Putrada Ekadashi : आज नववर्षातली पहिली एकादशी आहे. पुत्रदा एकादशी म्हणजे काय. कशी करावी पुत्रदा एकादशीची पूजा. वाचा सविस्तर

  • Shubh Muhurta & Pooja Vidhi Of Putrada Ekadashi : आज नववर्षातली पहिली एकादशी आहे. पुत्रदा एकादशी म्हणजे काय. कशी करावी पुत्रदा एकादशीची पूजा. वाचा सविस्तर

पौष पुत्रदा एकादशी २ जानेवारी २०२३

ट्रेंडिंग न्यूज

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही या वस्तू खरेदी करू नका, नाहीतर आयुष्यभर घरात दारिद्र्य राहील

Ganga Saptami 2024 : यंदा गंगा सप्तमी कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Varuthini Ekadashi 2024 : काय आहे वरुथिनी एकादशीचे महत्त्व? कशी मिळते पापातून मुक्ती? वाचा संपूर्ण कथा

Festival List May 2024 : मे महिन्यातील सण-उत्सव, जयंतीची संपूर्ण यादी; जाणून घ्या तारीख, वार आणि महत्व

नव्या वर्षातली पहिली एकादशी आज आहे. ही एकादशी पौष पुत्रदा एकादशी या नावाने ओळखली जाते. आजच्या दिवशी श्री विष्णूंची पूजा करून व्रत ठेवल्यास पुत्रप्राप्ती होते. मृत्यूनंतर माणसाला मोक्षही मिळतो. पौराणिक कथेनुसार, राजा सुकेतुमानने पुत्रदा एकादशीचे व्रत पाळले आणि ऋषीमुनींनी सांगितलेल्या उपवास पद्धतीनुसार पूजा केली, ज्यामुळे त्यांना पुत्रप्राप्ती झाली आणि आयुष्याच्या शेवटी मोक्ष प्राप्त झाला. भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला पुत्रदा एकादशी व्रताचे महत्त्व सविस्तर सांगितले होते.

पौष पुत्रदा एकादशी व्रताचे शुभ मुहूर्त कोणते

एकादशीची सुरुवात: ०१ जानेवारी, रविवार, संध्याकाळी ७.११ पासून

एकादशी तिथी समाप्त: ०२ जानेवारी, सोमवार, रात्री ८:२३ वाजता

साध्य योग: २ जानेवारी, सकाळी ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६.५३ मिनिटांपर्यंत

शुभ योग: ३ जानेवारी, सकाळी ६.५३ पासून दिवसभर

रवि योग: २ जानेवारी, सकाळी ७.१४ ते दुपारी २.२४ पर्यंत

पौष पुत्रदा एकादशी उपवास: ०३ जानेवारी, सकाळी ७:१४ ते ९:१९ पर्यंत

पौष शुक्ल द्वादशी तिथी समाप्त: ३ जानेवारी, रात्री १०.०१ वाजेपर्यंत

पौष पुत्रदा एकादशी व्रत आणि पूजा पद्धती

ज्या जोडप्यांना हा व्रत संततीच्या इच्छेने ठेवायचं असेल त्यांनी सकाळी स्नान आणि ध्यान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. त्यानंतर पौष पुत्रदा एकादशीचे व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प करावा.

या दिवशी फक्त फलाहार करावा. शुभ मुहूर्तावर श्रीविष्णूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. त्यानंतर त्यांना पंचामृत स्नान घालावं. पिवळे वस्त्र अर्पण करावे.

हार, पिवळी फुले, अक्षता, तुळशीची पाने, नैवेद्य, फळे, मिठाई, दीप इत्यादी अर्पण करून पूजा करा. पूजेच्या वेळी ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा.

पूजेच्या वेळी विष्णू चालीसा, विष्णू सहस्रनाम आणि पौष पुत्रदा एकादशी व्रताचे पठण करा मग तुपाच्या दिव्याने विष्णूची आरती करावी.

त्यानंतर पुत्रप्राप्तीसाठी श्रीविष्णू यांचे आशीर्वाद घ्या, जेणेकरून तुमची इच्छा पूर्ण होईल.

रात्रीच्या वेळी भागवत जागरण करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून पूजा करा. ब्राह्मणाला त्याच्या क्षमतेनुसार दान आणि दक्षिणा देऊन निरोप द्या. त्यानंतर भोजन करून व्रत पूर्ण करा.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा