मराठी बातम्या  /  धर्म  /  January 2023 : जानेवारी २०२३ मध्ये येणारे सण उत्सव कोणते, शुभ मुहूर्त कोणते

January 2023 : जानेवारी २०२३ मध्ये येणारे सण उत्सव कोणते, शुभ मुहूर्त कोणते

Dec 31, 2022, 10:31 AM IST

  • Festivals In January 2023 : जानेवारी महिन्यात कोणते सण उत्सव आपल्या भेटीला येणार आहेत, त्यांचे शुभ मुहूर्त कोणते, तारीख कोणती असे अनेक प्रश्न जर तुम्हाला भेडसावत असतील तर जानेवारीच्या सण उत्सवांचं हे कॅलेंडर तुमच्या जवळ बाळगा.

जानेवारी २०२३ चे सण उत्सव (हिंदुस्तान टाइम्स)

Festivals In January 2023 : जानेवारी महिन्यात कोणते सण उत्सव आपल्या भेटीला येणार आहेत, त्यांचे शुभ मुहूर्त कोणते, तारीख कोणती असे अनेक प्रश्न जर तुम्हाला भेडसावत असतील तर जानेवारीच्या सण उत्सवांचं हे कॅलेंडर तुमच्या जवळ बाळगा.

  • Festivals In January 2023 : जानेवारी महिन्यात कोणते सण उत्सव आपल्या भेटीला येणार आहेत, त्यांचे शुभ मुहूर्त कोणते, तारीख कोणती असे अनेक प्रश्न जर तुम्हाला भेडसावत असतील तर जानेवारीच्या सण उत्सवांचं हे कॅलेंडर तुमच्या जवळ बाळगा.

जानेवारी महिना आपल्यासाठी सण उत्सवांची रेलचेल घेऊन येणार आहे. अशात नव्या वर्षाचं स्वागत करताना जानेवारी महिन्यात कोणते सण उत्सव आपल्या भेटीला येणार आहेत, त्यांचे शुभ मुहूर्त कोणते, तारीख कोणती असे अनेक प्रश्न जर तुम्हाला भेडसावत असतील तर जानेवारीच्या सण उत्सवांचं हे कॅलेंडर तुमच्या जवळ बाळगा.

ट्रेंडिंग न्यूज

Masik Pradosh Vrat : मे महिन्यात मासिक प्रदोष व्रत कधी? अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

Sita Navami : सीता नवमी कधी आहे? जाणून घ्या तिथीचे महत्व, पूजनाची योग्य पद्धत, मंत्र आणि स्तोत्र

जानेवारी २०२३ चं कॅलेंडर 

२ जानेवारी, सोमवार - पौष पुत्रदा एकादशी

४ जानेवारी, बुधवार - प्रदोष व्रत

६ जानेवारी, शुक्रवार - पौष पौर्णिमा व्रत

१० जानेवारी, मंगळवार - संकष्टी

१५ जानेवारी, शनिवार - मकर संक्रांती, उत्तरायण, पोंगल

१८ जानेवारी, बुधवार - षट्तिला एकादशी

१९ जानेवारी, गुरुवार - प्रदोष व्रत

२१ जानेवारी, शनिवार - मौनी अमावस्या

२५ जानेवारी, बुधवार - श्रीगणेश जयंती

२६ जानेवारी, गुरुवार - वसंत पंचमी

मकर संक्रांती २०२३

हिंदू धर्मात मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे. हा सण अनेक कारणांसाठी साजरा केला जातो. तसे तर संक्रांत दर महिन्याला येते, पण सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण येतो. या दिवशी हिंदू कुटुंबांमध्ये खिचडी बनवण्याची, दानधर्म करण्याची आणि पतंग उडवण्याची प्रथा आहे. या दिवशी अनेक लोक पवित्र नदीत स्नानही करतात. या सणाला स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. महाराष्ट्रात या दिवशी तीळगूळ बनवतात आणि एकमेकांना वाटतात.

षट्तिला एकादशी २०२३

एकादशीचा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यास शुभ फल प्राप्त होते. षट्तिला एकादशीला तीळ लावून स्नान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी घरातील मंदिरात उपस्थित असलेल्या गोपाळांना तीळ लावून स्नान केल्यास विशेष फळ मिळते.

शुभ वेळ- १७ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ६.०५ वाजता सुरू होईल आणि १८ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता संपेल.

श्रीगणेश जयंती २०२३

संकष्टी चतुर्थी व्रताचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हे व्रत गणपतीला समर्पित आहे. असे मानले जाते की या दिवशी गणेशाची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात. 

पंचांगानुसार माघ महिन्यातील श्री गणेश जयंती २५ जानेवारी २०२३ रोजी साजरी केली जाईल. २४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी श्री गणेश जयंतीची सुरुवात होईल. तर २५ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी जयंती संपेल.

वसंत पंचमी २०२३

हिंदूंच्या सणांमध्ये वसंत पंचमीचा सण नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांनी या दिवशी वह्या-पेनचीही पूजा करावी. त्यामुळे बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढते असे म्हणतात.

पूजेची शुभ मुहूर्त - २६ जानेवारी रोजी सकाळी ७.१२ वाजता सुरू होऊन दुपारी १२.३४ वाजता समाप्त होईल.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या