मराठी बातम्या  /  धर्म  /  Vastu Tips : घरात कोणत्या दिशेला ठेवावं गंगाजल?, त्याचे फायदे काय आहेत?

Vastu Tips : घरात कोणत्या दिशेला ठेवावं गंगाजल?, त्याचे फायदे काय आहेत?

May 21, 2023, 07:35 AM IST

  • Vastu Tips For Gangajal : राजा भगिरथाच्या अथक प्रयत्नांनी गंगा पृथ्वीवर अवतरली म्हणूनच गंगेत स्नान करताना हरगंगे भागिरथी असं आवर्जुन म्हटलं जातं. गंगेच्या पाण्याबाबात अनेक शोध लावले जात आहेत. मात्र अत्यंत शुद्ध पाणी म्हणून गंगेच्या पाण्याकडे पाहिलं जातं.

घरात कोणत्या दिशेला ठेवावं गंगाजल (HT)

Vastu Tips For Gangajal : राजा भगिरथाच्या अथक प्रयत्नांनी गंगा पृथ्वीवर अवतरली म्हणूनच गंगेत स्नान करताना हरगंगे भागिरथी असं आवर्जुन म्हटलं जातं. गंगेच्या पाण्याबाबात अनेक शोध लावले जात आहेत. मात्र अत्यंत शुद्ध पाणी म्हणून गंगेच्या पाण्याकडे पाहिलं जातं.

  • Vastu Tips For Gangajal : राजा भगिरथाच्या अथक प्रयत्नांनी गंगा पृथ्वीवर अवतरली म्हणूनच गंगेत स्नान करताना हरगंगे भागिरथी असं आवर्जुन म्हटलं जातं. गंगेच्या पाण्याबाबात अनेक शोध लावले जात आहेत. मात्र अत्यंत शुद्ध पाणी म्हणून गंगेच्या पाण्याकडे पाहिलं जातं.

शिवाच्या म्हणजेच महादेवाच्या जटांमधून स्वर्गातून खाली पृथ्वीवर येताना भगिरथाच्या मस्तकावरून गंगा पृथ्वीवर अवतरली असा दाखला आपल्याला इतिहासात पाहायला मिळतो. राजा भगिरथाच्या अथक प्रयत्नांनी गंगा पृथ्वीवर अवतरली म्हणूनच गंगेत स्नान करताना हरगंगे भागिरथी असं आवर्जुन म्हटलं जातं. गंगेच्या पाण्याबाबात अनेक शोध लावले जात आहेत. मात्र अत्यंत शुद्ध पाणी म्हणून गंगेच्या पाण्याकडे पाहिलं जातं. गंगेचं पाणी घरोघरी देवघरात ठेवलेलं पाहायला मिळतं. गंगेचं पाणी कोणत्या दिशेला ठेवावं आणि त्याचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

Festival List May 2024 : मे महिन्यातील सण-उत्सव, जयंतीची संपूर्ण यादी; जाणून घ्या तारीख, वार आणि महत्व

Gemstones : तुमच्या राशीनुसार हे रत्न धारण करा, भाग्य उजळेल, आर्थिक भरभराट होईल, जाणून घ्या

Vinayak Chaturthi 2024 : विनायक चतुर्थी कधी? यंदा चतुर्थीला तयार होतायत हे शुभ संयोग, जाणून घ्या

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया कधी आहे? सोनं खरेदी करण्याची ही शुभ वेळ नोंद करून ठेवा

गंगाजल घरात कोणत्या दिशेला ठेवावं?

गंगाजल देवघरात इशान्य कोनात ठेवलं गेलं पाहिजे.

गंगाजलाचे फायदे काय आहेत? 

गंगेच्या पाण्यात स्नान केल्याने सर्व प्रकारची पापे धुतली जातात. गंगा नदीला पापमोचनी नदी म्हणतात. 

सूर्य किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी घरामध्ये गंगाजल शिंपडल्यास ग्रहणाचा प्रभाव संपतो.  

कोणत्याही शुभ प्रसंगी, गंगेचे पाणी घर, यज्ञवेदी किंवा इतर कोणत्याही स्थानाला पवित्र करण्यासाठी वापरले जाते.

गंगेचे पाणी प्यायल्याने सर्व आजार आणि दुःख दूर होतात. गंगेचं पाणी अत्यंत पवित्र मानले जाते कारण ते भगवान शिवाच्या जटांमधून बाहेर येते.

गंगेला मोक्षदायिनी नदी असं म्हणतात. एखाद्याचा जीव शरीर सोडताना तडफडत असेल तर त्याच्या डोक्यावर गंगाजल सोडल्यास ती व्यक्ती समाधानाने शरीर सोडते असं म्हटलं जातं.

गंगा ही एकमेव नदी आहे जिथे अमृत कुंभाचे थेंब दोन ठिकाणी पडले. प्रयाग आणि हरिद्वार इथं हे अमृत थेंब पडले. त्यामुळे गंगेच्या पाण्याचं महत्त्व वाढतं.

गंगेचे पाणी कधीच अशुद्ध होत नाही, या पाण्याला कधीही वास येत नाही. त्यामुळे हे पाणी घरात तांब्याच्या किंवा पितळ्याच्या भांड्यात भरून ठेवले जाते. हे पाणी घरात ठेवल्याने घरातल्या संकटांचा नाश होतो आणि घरात सुख नांदतं.

गंगेचे पाणी इतर कोणत्याही पाण्यात टाकल्यास ते पाणीही गंगेसारखे शुद्ध होते, कारण गंगेच्या पाण्यात बॅक्टेरियोफेज नावाचे बॅक्टेरिया असतात जे पाणी शुद्ध करतात.

गंगाजलामध्ये जीवनावश्यक हवेचे प्रमाण टिकवून ठेवण्याची अद्भुत क्षमता आहे. गंगेच्या पाण्यात वातावरणातील ऑक्सिजन शोषून घेण्याची अद्भुत क्षमता आहे. जेव्हा ऑक्सिजनची कमतरता भासेल तेव्हा या नदीच्या काठावर राहून किंवा तिचे पाणी पिऊन ऑक्सिजनची पातळी राखता येते. गंगेच्या पाण्यामुळे कॉलरा आणि आमांश यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. हे पाणी कोणत्याही शुद्ध ठिकाणाहून कधीही प्यायलं जाऊ शकते.

गंगेच्या पाण्यात भरपूर गंधक आहे, त्यामुळे ते खराब होत नाही. याशिवाय गंगेच्या पाण्यात काही भू-रासायनिक क्रियाही होतात. त्यामुळे त्यामध्ये कीटक कधीच उद्भवत नाहीत. यामुळेच गंगेचे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते. हे प्यायल्याने अनेक प्रकारचे रोग नष्ट होतात.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा