मराठी बातम्या  /  धर्म  /  Kalashtami : भगवान शिवाच्या उग्र रुपाची आज पूजा कशी कराल?

Kalashtami : भगवान शिवाच्या उग्र रुपाची आज पूजा कशी कराल?

Mar 14, 2023, 08:10 AM IST

  • Importance Of Kalashtami : कोणत्याही गोष्टीबाबत भीती वाटत असेल तर त्यापासून भैरव म्हणजे त्या भीतीपासून रक्षा करणारा असा त्याचा अर्थ होतो. या दिवशी ऊॅं कालभैलवाय नम: चा जप अवश्य करावा.

भगवान कालभैरव (हिंदुस्तान टाइम्स)

Importance Of Kalashtami : कोणत्याही गोष्टीबाबत भीती वाटत असेल तर त्यापासून भैरव म्हणजे त्या भीतीपासून रक्षा करणारा असा त्याचा अर्थ होतो. या दिवशी ऊॅं कालभैलवाय नम: चा जप अवश्य करावा.

  • Importance Of Kalashtami : कोणत्याही गोष्टीबाबत भीती वाटत असेल तर त्यापासून भैरव म्हणजे त्या भीतीपासून रक्षा करणारा असा त्याचा अर्थ होतो. या दिवशी ऊॅं कालभैलवाय नम: चा जप अवश्य करावा.

"अष्टकालं महाकालं भैरवाष्टगणान्वितम्।

ट्रेंडिंग न्यूज

Gemstones : तुमच्या राशीनुसार हे रत्न धारण करा, भाग्य उजळेल, आर्थिक भरभराट होईल, जाणून घ्या

Vinayak Chaturthi 2024 : विनायक चतुर्थी कधी? यंदा चतुर्थीला तयार होतायत हे शुभ संयोग, जाणून घ्या

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया कधी आहे? सोनं खरेदी करण्याची ही शुभ वेळ नोंद करून ठेवा

Marriage Mantra : मुलींच्या लग्नासाठी सर्वात प्रभावी मंत्र, मुलांची रांग लागेल, एकदा आजमावून पाहा

चंद्रमासहितं शुक्‍ल मृत्युंजय नमोऽस्तु ते ॥"

आज १४ मार्च मंगळवार २०२३. आज फाल्गुन कृष्ण पक्षातली सप्तमी आहे. आजचा दिवस भगवान कालभैरवाचा दिवस किंवा दुर्गेचा दिवस म्हणून साजरा केला जातो. ही दोनेही रुपं शक्तीचं प्रतीक आहेत. त्यामुळे भगवान शिव किंवा दुर्गा माता यांच्या उग्र रुपांना नमस्कार करण्याचा आणि त्यांचा कृपाशिर्वाद मिळवण्याचा आजचा दिवस आहे.

कालभैरवाची पूजा म्हणजे कोणत्याही गोष्टीबाबत भीती वाटत असेल तर त्यापासून भैरव म्हणजे त्या भीतीपासून रक्षा करणारा असा त्याचा अर्थ होतो. या दिवशी ऊॅं कालभैलवाय नम: चा जप अवश्य करावा. तुमच्यावर शनि आणि राहू यांची दशा असेल तर कालभैरवाचं स्मरण करावं.

वर्षात होतात १२ कालाष्टमी

दर महिन्याला एक कालाष्टमी याप्रमाणे वर्षभरात १२ कालाष्टमी पाहायला मिळतात. हा दिवस भगवान भैरवनाथाला समर्पित आहे. या दिवशी भैरवनाथाची पूजा आणि उपवास केले जातात. चंद्र महिन्यातल्या कृष्ण पक्ष अष्टमी तिथीला हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी हिंदू भाविक भगवान भैरवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील करतात.

कालाष्टमीचे माहात्म्य 'आदित्य पुराणात' सांगितले आहे. कालाष्टमीच्या दिवशी उपासनेचे मुख्य देवता भगवान कालभैरव आहेत ज्यांना भगवान शिवाचे रूप मानले जाते. हिंदीतील 'काल' म्हणजे 'काळ' तर 'भैरव' म्हणजे 'शिवांचे प्रकटन'. म्हणून कालभैरवाला 'काळाचा स्वामी' देखील म्हटले जाते.

कालाष्टमीला भगवान कालभैरवांना कसं कराल प्रसन्न

कालाष्टमीच्या दिवशी बिल्वपत्रावर ओम नमः शिवाय असं लिहावं, अशी २१ बिल्वपत्र शिवाला अर्पण करावी.

भगवान भैरवाचे वाहन म्हणून काळ्या श्वानाला पाहिलं गेलं आहे. आज काळ्या श्वानाला तुम्ही खाऊ घालू शकता. तसंच गाईलाही काऊ घालू शकता. असं केल्याने भगवान भैरव आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतात.

ब्राह्मणांना अन्न, वस्त्र आणि पैसा दान करा.

कालाष्टमीच्या दिवसापासून ४० दिवस सतत कालभैरवाचे दर्शन घ्या.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा