मराठी बातम्या  /  धर्म  /  Lizard Falling : अचानक अंगावर पाल पडण्याचे संकेत काय असतात? अशा घडतात शुभ-अशुभ गोष्टी

Lizard Falling : अचानक अंगावर पाल पडण्याचे संकेत काय असतात? अशा घडतात शुभ-अशुभ गोष्टी

Apr 15, 2024, 06:38 PM IST

    • Lizard Falling on Hand : शकुन शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्याअंगावर पाल पडली तर ते शुभाचे प्रतीक मानले जाते. मान्यतेनुसार, जेव्हा पाल अंगावर पडते तेव्हा आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.
Lizard Falling : अचानक अंगावर पाल पडण्याचे संकेत काय असतात? अशा घडतात शुभ-अशुभ गोष्टी

Lizard Falling on Hand : शकुन शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्याअंगावर पाल पडली तर ते शुभाचे प्रतीक मानले जाते. मान्यतेनुसार, जेव्हा पाल अंगावर पडते तेव्हा आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.

    • Lizard Falling on Hand : शकुन शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्याअंगावर पाल पडली तर ते शुभाचे प्रतीक मानले जाते. मान्यतेनुसार, जेव्हा पाल अंगावर पडते तेव्हा आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.

ज्योतिषशास्त्रामध्ये मानवी जीवनाशी संबंधित अनेक रहस्यांची माहिती मिळते. व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनांचाही ज्योतिषशास्त्रात तपशीलवार उल्लेख आहे. पम येथे आपण घरामध्ये दिसणार्‍या प्राण्यांशी संबंधित शुभ आणि अशुभ संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

Ganga Saptami 2024 : यंदा गंगा सप्तमी कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Varuthini Ekadashi 2024 : काय आहे वरुथिनी एकादशीचे महत्त्व? कशी मिळते पापातून मुक्ती? वाचा संपूर्ण कथा

Festival List May 2024 : मे महिन्यातील सण-उत्सव, जयंतीची संपूर्ण यादी; जाणून घ्या तारीख, वार आणि महत्व

Gemstones : तुमच्या राशीनुसार हे रत्न धारण करा, भाग्य उजळेल, आर्थिक भरभराट होईल, जाणून घ्या

आपल्या घरात असे अनेक जीव राहतात, ज्यांचा आपल्याशी थेट संबंध नसतो. पण ते दररोज आपल्या नजरेस पडतात. यापैकी एक म्हणजे पाल. पालीचे नाव ऐकून किंवा पाल पाहून अनेकांना भीती किंवा किळसवाणे वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का की जर तुमच्या अंगावर किंवा हातावर पाल पडली तर त्याचा नेमका अर्थ काय होतो?  शकुन शास्त्रात याबाबत सविस्तर सांगण्यात आले आहे.

पाल अंगावर पडण्याचे शुभ संकेत

शकुन शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्याअंगावर पाल पडली तर ते शुभाचे प्रतीक मानले जाते. मान्यतेनुसार, जेव्हा पाल अंगावर पडते तेव्हा आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. पाल अंगावर पडणे मान-सन्मानात वाढ होण्याचे संकेत दर्शवते. असे म्हणतात की, पाल अंगावर पडले की नवीन कपडे मिळतात.

माणसाच्या हातावर पाल पडली तर…

शकुन शास्त्रानुसार पुरुष आणि स्त्रीच्या अंगावर पडणाऱ्या पालीचे वेगवेगळे अर्थ आहेत. जर एखाद्या व्यक्तीच्या डाव्या हातावर पाल पडली तर त्याचा अर्थ, त्या व्यक्तीच्या मालमत्तेचे नुकसान होऊ शकते किंवा त्याची मालमत्ता हिसकावून घेतली जाऊ शकते. जर त्या माणसाच्या उजव्या हातावर पाल पडली तर ते खूप शुभ मानले जाते. हे अचानक धनप्राप्तीचे लक्षण आहे.

स्त्रीच्या हातावर पाल पडली तर…

शकुन शास्त्रानुसार जर स्त्रीच्या डाव्या हातावर पाल पडली तर ते अशुभ लक्षण आहे. यामध्ये महिलेला आर्थिक नुकसानीच्या संकटातून जावे लागते. त्याचबरोबर स्त्रीच्या उजव्या हातावर पाल पडली तर ते शुभ चिन्ह मानले जाते. उजव्या हातावर पाल पडणे हे देवी लक्ष्मीची कृपा होण्याचे लक्षण मानले जाते. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळण्याचे हे लक्षण आहे.

 

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा