Ambedkar Jayanti Wishes: बाबासाहेबांचे विचार आणि ‘या’ खास संदेशांसह प्रियजनांना द्या ‘आंबेडकर जयंती’च्या शुभेच्छा!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Ambedkar Jayanti Wishes: बाबासाहेबांचे विचार आणि ‘या’ खास संदेशांसह प्रियजनांना द्या ‘आंबेडकर जयंती’च्या शुभेच्छा!

Ambedkar Jayanti Wishes: बाबासाहेबांचे विचार आणि ‘या’ खास संदेशांसह प्रियजनांना द्या ‘आंबेडकर जयंती’च्या शुभेच्छा!

Published Apr 12, 2024 12:28 PM IST

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2024 Wishes In Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काही अनमोल विचार आणि खास संदेश पाठवून तुम्ही या दिवशी तुमच्या मित्रांना ‘आंबेडकर जयंती’च्या शुभेच्छा देऊ शकता.

बाबासाहेबांचे विचार आणि ‘या’ खास संदेशांसह प्रियजनांना द्या ‘आंबेडकर जयंती’च्या शुभेच्छा!
बाबासाहेबांचे विचार आणि ‘या’ खास संदेशांसह प्रियजनांना द्या ‘आंबेडकर जयंती’च्या शुभेच्छा!

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2024 Wishes In Marathi: दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १४ एप्रिल रोजी डॉ. भीमराव आंबेडकर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. दलित वर्गाला समाजात समानता मिळवून देण्याबरोबरच त्यांनी समाजसुधारणेसाठीही अनेक कामे केली. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. पण, ते आपल्या सर्वांसाठीच नाही तर अवघ्या जगासाठी एक मूर्तिमंत उदाहरण बनले आहेत, ज्यातून सर्वांना प्रेरणा मिळते. या खास दिनी तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काही अनमोल विचार आणि खास संदेश पाठवून तुम्ही या दिवशी तुमच्या मित्रांना ‘आंबेडकर जयंती’च्या शुभेच्छा देऊ शकता.

डॉ. भीमराव आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथील एका सामान्य कुटुंबात झाला. त्या काळात समाजात अनेक गोष्टी अस्पृश्य मानल्या जात होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, शोषित, मागासलेल्या लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान विचारवंत, समाजसुधारक, न्यायशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकारही म्हटले जाते.

प्रियजनांना द्या ‘आंबेडकर जयंती’च्या शुभेच्छा!

> आंबेडकर जयंतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. बाबासाहेबांच्या शिकवणीतून तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी लढण्यासाठी आणि तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळो.

 

> बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक लोकशाहीचा मार्ग आपल्याला समतेवर आधारित जग निर्माण करण्याची प्रेरणा देईल. आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

 

> निळ्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे,

घाबरू नको कोणाच्या बापाला तू भीमाचा वाघ आहे!

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्ही येणार म्हटल्यानं नसानसात भरली स्फूर्ती,

आतुरता फक्त आगमनाची जयंती माझ्या बाबांची!

भीम जयंतीच्या शुभेच्छा!

 

> हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा वेग जास्त होता...

अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता...

असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर...

लाखात नाहीतर जगात एक होता!

भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

नमन त्या देशप्रेमाला

नमन त्या ज्ञान देवतेला

नमन त्या महापुरुषाला

नमन अशा आपल्या बाबासाहेबांना

आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

 

>ज्याने सर्वांना समजले एक समान,

असे होते आमचे बाबा महान.

सर्वांना स्वतंत्र आणि आनंदाने जगायला शिकवले भीमाने,

स्वतंत्र आणि समानतेचा नारा दिला भीमाने…

जय भीम जय शिवराय…

Whats_app_banner