मराठी बातम्या  /  धर्म  /  Guru Pradosh Vrat : जूनच्या पहिल्याच दिवशी आलेल्या प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त कोणता?

Guru Pradosh Vrat : जूनच्या पहिल्याच दिवशी आलेल्या प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त कोणता?

Jun 01, 2023, 06:07 AM IST

  • Importance Of Pradosh Vrat : व्रत गुरुवारी येत असल्याने याला गुरु प्रदोष व्रत असंही म्हटलं जातं. शिवशंकराची पूजा आणि कृपाप्राप्ती यासाठी हे प्रदोष व्रत केलं जातं.

गुरु प्रदोष व्रत

Importance Of Pradosh Vrat : व्रत गुरुवारी येत असल्याने याला गुरु प्रदोष व्रत असंही म्हटलं जातं. शिवशंकराची पूजा आणि कृपाप्राप्ती यासाठी हे प्रदोष व्रत केलं जातं.

  • Importance Of Pradosh Vrat : व्रत गुरुवारी येत असल्याने याला गुरु प्रदोष व्रत असंही म्हटलं जातं. शिवशंकराची पूजा आणि कृपाप्राप्ती यासाठी हे प्रदोष व्रत केलं जातं.

प्रदोष व्रताला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. प्रदोष व्रत महिन्यातून दोनदा केले जाते. एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षात. प्रदोष व्रतात भगवान शंकराची विधीनुसार पूजा केल्यास माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

ट्रेंडिंग न्यूज

Chardham Yatra 2024 : चारधाममध्ये कोणत्या देवी-देवतांची पूजा केली जाते? जाणून घ्या

Shani Jayanti 2024 : शनि जयंतीला करा हे उपाय, सर्व अडचणी दूर होतील

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही या वस्तू खरेदी करू नका, नाहीतर आयुष्यभर घरात दारिद्र्य राहील

Ganga Saptami 2024 : यंदा गंगा सप्तमी कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

यंदाचं प्रदोष व्रत ०१ जून २०२३ रोजी येत आहे आणि हे व्रत गुरुवारी येत असल्याने याला गुरु प्रदोष व्रत असंही म्हटलं जातं. शिवशंकराची पूजा आणि कृपाप्राप्ती यासाठी हे प्रदोष व्रत केलं जातं.

गुरु प्रदोष व्रताचे शुभ मुहूर्त कोणते आहेत हे आधी पाहूया.

गुरु प्रदोष व्रत पूजेचा शुभ मुहूर्त कोणता?

त्रयोदशी तिथी - ०१ जून रोजी दुपारी ०१.३८ पासून सुरू होईल आणि ०२ जून रोजी रात्री १२.४७ पर्यंत चालेल. 

प्रदोष व्रत पूजा - पद्धत

सकाळी लवकर उठून आंघोळ करावी.

आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घाला.

घरातील मंदिरात दिवा लावावा.

भगवान भोलेनाथांचा गंगाजलाने अभिषेक करा.

भगवान भोलेनाथांना फुले अर्पण करा.

या दिवशी भोलेनाथसोबत देवी पार्वती आणि गणेशाची पूजा करावी. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते.

भगवान शंकराला नैवेद्य दाखवावा. भगवंताला फक्त सात्विक गोष्टी अर्पण केल्या जातात हे ध्यानात ठेवा.

भगवान शिवाची आराधना करा.

या दिवशी देवाचे अधिकाधिक ध्यान करावे.

प्रदोष व्रताचे महत्त्व

धार्मिक मान्यतेनुसार आठवड्यातील सात दिवसांच्या प्रदोष व्रताचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे.

गुरु प्रदोष व्रत केल्याने इच्छित फळ मिळते.

हे व्रत पाळल्याने बालकांना फायदा होतो.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा