मराठी बातम्या  /  धर्म  /  Chaitra Navratri 2023 : घरात हवी असेल सुख-शांती तर नवरात्रीत करा 'हे' उपाय

Chaitra Navratri 2023 : घरात हवी असेल सुख-शांती तर नवरात्रीत करा 'हे' उपाय

Mar 24, 2023, 08:47 AM IST

  • Things To Do During Navratri : जर तुम्हाला घरात सुखशांती आणि समृद्धी हवी असेल तर संपूर्ण नवरात्रीच्या काळात तुम्हाला काही गोष्टी आहेत, ज्या पाळाव्याच लागतील.

चैत्र नवरात्र २०२३ (हिंदुस्तान टाइम्स)

Things To Do During Navratri : जर तुम्हाला घरात सुखशांती आणि समृद्धी हवी असेल तर संपूर्ण नवरात्रीच्या काळात तुम्हाला काही गोष्टी आहेत, ज्या पाळाव्याच लागतील.

  • Things To Do During Navratri : जर तुम्हाला घरात सुखशांती आणि समृद्धी हवी असेल तर संपूर्ण नवरात्रीच्या काळात तुम्हाला काही गोष्टी आहेत, ज्या पाळाव्याच लागतील.

चैत्र नवरात्र सुरू होऊन आज ३ दिवस पूर्ण झाले आहेत. अशात जर तुम्हाला घरात सुखशांती आणि समृद्धी हवी असेल तर संपूर्ण नवरात्रीच्या काळात तुम्हाला काही गोष्टी आहेत, ज्या पाळाव्याच लागतील. या गोष्टी मनोभावे केल्यास तुम्हाला पुढचं वर्षभर कसलीही कमतरता राहाणार नाही. तुमचा परिवार आणि तुम्ही अत्यंत आनंदी असाल आणि निरोगीही असाल.

ट्रेंडिंग न्यूज

Rashtrasant Tukdoji Maharaj Jayanti : आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती, वाचा त्यांचा जीवन प्रवास

Lucky Plants for Home : कमी दिवसांमध्ये श्रीमंत व्हायचे असेल तर ही झाडं तुमच्या घरात नक्कीच लावा, जाणून घ्या

Shani Jayanti 2024 : शनि जयंतीला या गोष्टी लक्षात ठेवा, शनि जयंतीचं धार्मित महत्व काय? जाणून घ्या

Ravi Pradosh Vrat 2024 : मे महिन्याचे पहिले प्रदोष वृत कधी? शुभ मुहूर्त, पुजा कशी करायची? जाणून घ्या

नवरात्रीत कोणत्या गोष्टींचं पालन करावं

नवरात्रीत दररोज दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा.

नवरात्रीत रोज देवळात जावं.

घरात अखंड ज्योत तेवत ठेवावी.

घरात फक्त सात्विक अन्नच शिजवावं. घरातल्या सदस्यांनी उपवास केला नसला तरीही चालेल मात्र नवरात्रीचे नऊ दिवस फक्त सात्विक जेवणच घ्यावं.

घरात कलश स्थापना केली असेल तर घरात किमान एक सदस्य असलाच पाहिजे. घर बंद करून कुठेही जाऊ नये.

नवरात्रीत दाढी करणे, नखं कापणे, केसं कापणे टाळावे.

रोज पूजा आरती करावी. देवीला नैवेद्य अर्पण करावा.

नवरात्रीत आपल्या घराच्या दरवाज्याच्या उंबरठ्यावर देवीची पावलं लावावीत. असं केल्याने घरात सुख येतं.

आग्नेय दिशेला अखंड ज्योत असावी. एक ग्लास पाण्याने भरून पूर्व किंवा उत्तरेला ठेवावा. त्यात पिवळं किंवा लाल फूल ठेवावं. असं केल्याने कामातल्या सर्व अडचणी दूर होतात.

नवरात्रीत देवीला लाल किंवा पिवळं किंवा गुलाबी फूल अर्पण करावं.

एखाद्या मोठ्या भांड्यात उमललेलं कमळ ठेवावं.

नवरात्रीचे नऊ दिवस दारात रांगोळी काढावी.

अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कुमारिकांना जेवायला आपल्या घरी बोलवावं. यथाशक्ती त्यांना दक्षिणा द्यावी.

घरात तुळशीचं रोप लावावं. हे रोप उत्तर-पूर्व दिशेला असावं.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा