मराठी बातम्या  /  धर्म  /  Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी दुर्गामाता घेऊन येतेय आनंदाची बातमी

Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी दुर्गामाता घेऊन येतेय आनंदाची बातमी

Mar 14, 2023, 11:53 AM IST

  • Chaitra Navratri Durga Will Arrive On Boat : नवरात्रीच्या आधी देवी दुर्गेचं वाहन कोणतं आहे हे पाहिलं जातं. यंदा त्याही बाबतीत शुभ वर्तमान आहे कारण, माता दुर्गा बोटीतून बसून भक्तांच्या दर्शनाला येणार आहे. त्यामुळे या वर्षी भरपूर पाऊस पडणार असल्याचे शुभ संकेत दुर्गामाता चैत्राच्या पहिल्याच दिवशी घेऊन येत आहे.

दुर्गामाता (हिंदुस्तान टाइम्स)

Chaitra Navratri Durga Will Arrive On Boat : नवरात्रीच्या आधी देवी दुर्गेचं वाहन कोणतं आहे हे पाहिलं जातं. यंदा त्याही बाबतीत शुभ वर्तमान आहे कारण, माता दुर्गा बोटीतून बसून भक्तांच्या दर्शनाला येणार आहे. त्यामुळे या वर्षी भरपूर पाऊस पडणार असल्याचे शुभ संकेत दुर्गामाता चैत्राच्या पहिल्याच दिवशी घेऊन येत आहे.

  • Chaitra Navratri Durga Will Arrive On Boat : नवरात्रीच्या आधी देवी दुर्गेचं वाहन कोणतं आहे हे पाहिलं जातं. यंदा त्याही बाबतीत शुभ वर्तमान आहे कारण, माता दुर्गा बोटीतून बसून भक्तांच्या दर्शनाला येणार आहे. त्यामुळे या वर्षी भरपूर पाऊस पडणार असल्याचे शुभ संकेत दुर्गामाता चैत्राच्या पहिल्याच दिवशी घेऊन येत आहे.

चैत्र महिना म्हणजेच नववर्ष येत्या २२ मार्च रोजी सुरू होणार आहे. चैत्राच्या पहिल्या दिवशी गुढी पाडवा आहे. महाराष्ट्रात घरोघरी गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं. गुढी उभारण्यामागे पौराणिक गोष्ट अशी की प्रभू श्रीरामांनी रावणाचा म्हणजेच असूरी शक्तींचा नाश केला आणि ते अयोध्येत परतले होते. त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ गुढी उभारण्यात आली होती.

ट्रेंडिंग न्यूज

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही या वस्तू खरेदी करू नका, नाहीतर आयुष्यभर घरात दारिद्र्य राहील

Ganga Saptami 2024 : यंदा गंगा सप्तमी कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Varuthini Ekadashi 2024 : काय आहे वरुथिनी एकादशीचे महत्त्व? कशी मिळते पापातून मुक्ती? वाचा संपूर्ण कथा

Festival List May 2024 : मे महिन्यातील सण-उत्सव, जयंतीची संपूर्ण यादी; जाणून घ्या तारीख, वार आणि महत्व

चैत्र शुद्ध प्रतिपदा २२ मार्च रोजी आहे आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे याच दिवसापासून चैत्र नवरात्र आरंभ देखील होत आहे. नवरात्रीच्या आधी देवी दुर्गेचं वाहन कोणतं आहे हे पाहिलं जातं. यंदा त्याही बाबतीत शुभ वर्तमान आहे कारण, माता दुर्गा बोटीतून बसून भक्तांच्या दर्शनाला येणार आहे. त्यामुळे या वर्षी भरपूर पाऊस पडणार असल्याचे शुभ संकेत दुर्गामाता चैत्राच्या पहिल्याच दिवशी घेऊन येत आहे.

चैत्र नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाणार आहे.

चैत्र नवरात्रीत हे शुभ योग तयार होत आहेत

या वेळी चैत्र नवरात्रीमध्ये नवरात्र पूर्ण नऊ दिवसांची असेल. नवरात्रीच्या काळात २३ मार्च, २७ मार्च आणि ३० मार्च रोजी तीन सर्वार्थ सिद्धी योग असतील. तर २७ आणि ३० मार्च रोजी अमृत सिद्धी योग होणार आहे. २४ मार्च, २६ मार्च आणि २९ मार्चला रवि योग होईल. आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी गुरु पुष्य योग असेल.

चैत्र नवरात्री घटस्थापना शुभ मुहूर्त

बुधवार, २२ मार्चपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. चैत्र नवरात्रीच्या घटस्थापनेच्या शुभ मुहूर्ताची सुरुवात २२ मार्च रोजी सकाळी ०६.२३ ते ०७.३२ (कालावधी १ तास ०९ मिनिटे) असेल. चैत्र नवरात्री प्रतिपदा तिथी २१ मार्च रोजी रात्री १०.५२ वाजता सुरू होत आहे आणि प्रतिपदा तिथी २२ मार्च रोजी रात्री ०८.२० वाजता समाप्त होईल.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा