मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  तरुणाला धडक देऊन कारच्या बोनेटवरून अर्धा किमी फरफटत नेले; पाहा CCTV व्हिडिओ

तरुणाला धडक देऊन कारच्या बोनेटवरून अर्धा किमी फरफटत नेले; पाहा CCTV व्हिडिओ

Jan 14, 2023, 07:07 PM IST

  • दिल्लीत पुन्हा एकदा कंझावालासारखी घटना घडली असून एका तरुणाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याची घटना घडली आहे.

तरुणाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले

दिल्लीत पुन्हा एकदा कंझावालासारखी घटना घडली असून एका तरुणाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याची घटना घडली आहे.

  • दिल्लीत पुन्हा एकदा कंझावालासारखी घटना घडली असून एका तरुणाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याची घटना घडली आहे.

दिल्लीत अंजली सिंह या तरुणीला कारचालक तरुणांनी१४किलोमीटरपर्यंत रस्त्यावरून फरफटत नेले होते. याअपघातात अंजलीचा मृत्यू झाला होता.आज राजौरी गार्डनमधूनही असेच भयावह चित्र समोर आले आहे.कारस्वाराने एका तरुणाला गाडीच्या बोनेटवरून रसत्यावर फरफटत नेल्याची घटना घडली आहे. या घटनेचेसीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आरोपीची ओळख पटली आहे.दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आयपीसीच्या कलम २७९,३२३,३४१,३०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

IITमध्ये शिकणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; २० वर्षातली धक्कादायक आकडेवारी जाहीर

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जातेय खिल्ली, VIDEO

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही गटामध्ये हॉर्न वाजवण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. वाद वाढल्यानंतर कारस्वाराने तरुणाला धडक दिली आणि गाडीच्या बोनेटवर सुमारे अर्धा किलोमीटर खेचून नेले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज एएनआय वृत्तसंस्थेने शेअर केले आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशीकांझवाला येथे असाच अपघात घडला होता. अंजली सिंह (२०) हिला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणांनी कारखाली तब्बल १४ किलोमीटरपर्यंत ओढत नेले होते. अडीच तास कारच्या चाकाखाली अडकून राहिल्याने अंजलीचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या मध्यरात्री अंजलीच्या स्कूटीला कारने धडक दिली,ज्यात ती कारखाली अडकली. या अपघातात अंजलीचा मृत्यू झाला.