मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi Crime News : ‘महिलेचा अश्लिल व्हिडिओ काढून आरोपीनं...’, संतापजनक घटनेनं राजधानी हादरली

Delhi Crime News : ‘महिलेचा अश्लिल व्हिडिओ काढून आरोपीनं...’, संतापजनक घटनेनं राजधानी हादरली

Jan 30, 2023, 10:12 PM IST

    • Delhi Crime News : आरोपीनं सोशल मीडियाद्वारे महिलेशी ओळख करत तिला जाळ्यात ओढलं. त्यानंतर अश्लिल व्हिडिओ शूट करून धक्कादायक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे.
Delhi Crime News Marathi (HT)

Delhi Crime News : आरोपीनं सोशल मीडियाद्वारे महिलेशी ओळख करत तिला जाळ्यात ओढलं. त्यानंतर अश्लिल व्हिडिओ शूट करून धक्कादायक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे.

    • Delhi Crime News : आरोपीनं सोशल मीडियाद्वारे महिलेशी ओळख करत तिला जाळ्यात ओढलं. त्यानंतर अश्लिल व्हिडिओ शूट करून धक्कादायक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे.

Delhi Crime News Marathi : गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये सेक्सटॉर्शनच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील सेक्सटॉर्शनच्या घटना ताज्या असतानाच आता राजधानी दिल्लीतही एका महिलेची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरून ओळख झालेल्या एका आरोपीनं महिलेचा अश्लिल व्हिडिओ शूट करून ब्लॅकमेल केल्याची घटना समोर आल्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी आरोपीला काही तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहे. राघव चौहान असं आरोपीचं नाव असून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यानं महिलेशी ओळख करत तिचे अश्लिल व्हिडिओ आणि फोटो काढले होते. त्यानंतर आता पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Farooq Abdullah : ''पाकिस्तानने बांगड्या भरल्या नाहीत, त्यांच्याकडेही अणुबॉम्ब''; फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त विधान

al jazeera ban in israel:इस्रायलमध्ये अल जझीरा वृत्तवाहिनीवर बंदी, हमास युद्धादरम्यान पंतप्रधान नेतन्याहूंची मोठी कारवाई

Viral Video: वडिलांच्या मृत्युनंतर १० वर्षांचा मुलगा घर चालवण्यासाठी विकतोय चिकन रोल, व्हिडिओ व्हायरल

Viral News : 'या' मुली बलात्कार करण्यास योग्य नाही! शाळेतील मुलांनी बनवलेली मुलींची यादी व्हायरल झाल्याने खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जुलै महिन्यात दिल्लीतील एका महिलेची राघव चौहान या तरुणासोबत सोशल मीडियावर मैत्री झाली होती. मेसेज आणि कॉलवर बोलणं सुरू झाल्यानंतर आरोपीनं महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एके दिवशी थेट व्हिडिओ कॉल करून महिलेला कपडे काढायला सांगत अश्लिल व्हिडिओ शूट केला. त्यानंतरआ आरोपी राघवने महिलेचा अश्लिल व्हिडिओ दाखवत तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यामुळं घाबरलेल्या महिलेनं आरोपीला १.२५ लाख रुपये दिले. परंतु तरीही आरोपी तिला सतत ब्लॅकमेल करत पैशांची मागणी करत होता. त्यानंतर आरोपीनं महिलेचा अश्लिल व्हिडिओ तिच्या पतीच्या मोबाईलवर पाठवून ७० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर मात्र पीडितेनं आणखी पैसे देण्यात नकार देत आरोपीविरोधात सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली.

महिलेनं तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तातडीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपी राघव हा शहरातील करोल बाग परिसरात राहत असल्याची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी थेट त्याच्या घरी छापेमारी करत त्याला अटक केली आहे. आरोपी राघवने अनेक सोशल मीडिया अकाऊंट्स ओपन केलेले असून त्याद्वारे तो महिलांची आर्थिक फसवणूक करत असल्याचं चौकशीत स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.