मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Asaram Bapu: बलात्कार प्रकरणात आसाराम बापू दोषी; न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार

Asaram Bapu: बलात्कार प्रकरणात आसाराम बापू दोषी; न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 30, 2023 10:20 PM IST

Gandhinagar Court: सुरतमधील आश्रमात अनुयायी तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला गुजरातच्या गांधीनगर न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

Asaram Bapu
Asaram Bapu

Asaram Bapu: गुजरातच्या गांधीनगर न्यायालयाने आज (३० जानेवारी २०२३) सुरतमधील अनुयायी तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला दोषी ठरवले. आसाराम बापू सध्या जोधपूर तुरुंगात असून उद्या त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे. याप्रकरणात आसाराम बापू यांची पत्नी, दोन मुली आणि चार महिला अनुयायींना दोषी ठरण्यात आले होते. परंतु, गांधीनगर न्यायालयाने संबंधित सर्वांची निर्दोष सुटका केली.

दरम्यान, २०१३ मध्ये दोन सख्या बहिणींनी आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साई यांच्याविरोधात बलाल्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती. आसाराम बापूने मोठ्या बहिणीवर आणि त्याचा मुलगा नारायण साईने धाकट्या बहिणीवर बलात्कार केल्याचे पीडितांनी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले. पीडित बहिणींनी पिता-पुत्राच्या विरोधात स्वतंत्र तक्रारी केल्या होत्या. या प्रकरणी गुजरातच्या गांधीनगर न्यायालयाने आज महत्तपूर्ण निर्णय दिला. याप्रकरणी आसाराम बापूला दोषी ठरवले असून त्याला उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.

आसाराम बापू दुसऱ्या बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सध्या तो जोधपूरच्या तरूंगात आहे. २०१३ मध्ये जोधपूरच्या आश्रमात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तो दोषी आढळला होता. याआधीही जेव्हा-जेव्हा आसाराम यांना न्यायालयाकडून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, तेव्हा त्याला मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही सर्वोच्च न्यायालयात आसारामच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली होती. म्हातारपण आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामीन मिळायला हवा, अशी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तसे केले नाही.

WhatsApp channel

विभाग