मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात काँग्रेसचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले!

Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात काँग्रेसचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले!

May 13, 2023, 04:10 PM IST

    • Karnataka Election Results 2023 Live : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने १३७ जागांवर आघाडी घेत बहुमताच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.
Congress President Mallikarjun Kharge (PTI)

Karnataka Election Results 2023 Live : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने १३७ जागांवर आघाडी घेत बहुमताच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.

    • Karnataka Election Results 2023 Live : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने १३७ जागांवर आघाडी घेत बहुमताच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.

Karnataka Election Results 2023 Live : कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धूळ चारत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. काँग्रेसने आतापर्यंत ७९ जागांवर विजय मिळवला असून ५७ जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहे. दुसरीकडे भाजपने ३९ तर जनता दलाने १४ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळं आता कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळं आता कर्नाटकातील पुढचा मुख्यमंत्री कोण होणार?, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

Viral Video: पतीचे दोन्ही हात बांधून दिले सिगारेटचे चटके, नंतर चाकूनं प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न, पत्नीला अटक

Viral Video : ७५ लाख किंमतीच्या कारमध्ये फिरते वडापाव विकणारी तरुणी; हे कसं घडलं?

Air India Express Flight: एअर इंडिया एक्सप्रेसचे ७८ उड्डाणं अचानक रद्द ! आजारी असल्याचे कारण देत क्रू मेंबर्स गेले रजेवर

कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, कोणत्याही राज्यातील निवडणूक संपल्यावर मुख्यमंत्री कुणाला करायचं, याबाबत काँग्रेसमध्ये एक प्रक्रिया राबवली जाते. त्यानुसारच अंतिम निर्णय घेतला जातो. कर्नाटकातील अंतिम निकाल हाती आल्यानंतर आम्ही विजयी आमदारांची एक बैठक बोलावणार आहोत, त्यात केंद्रीय निरिक्षक आणि अन्य नेत्यांचं जे मत तयार होतं, ते पक्षातील शीर्ष नेत्यांना सांगितलं जातं. त्यानंतर सर्वजण एकत्र बसून त्यावर निर्णय घेत असतात, असं मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं आहे.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचा दावा एक्झिट पोलमध्ये करण्यात आल्यानंतर डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी बंगळुरूत एक मुलाखत घेत या चर्चांचं खंडन केलं होतं. त्यामुळं आता काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची उद्या बैठक बोलावली जाणार असून त्यात मुख्यमंत्रीपदासाठी कोणत्या नेत्याचं नाव फायनल केलं जातं, याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.