मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  mallikarjun kharge: काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत अचानक पुढं आलेले मल्लिकार्जुन खर्गे आहेत कोण?

mallikarjun kharge: काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत अचानक पुढं आलेले मल्लिकार्जुन खर्गे आहेत कोण?

Sep 30, 2022, 01:06 PM IST

    • Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता मल्लिकार्जुन खर्गे हे उमेदवारी दाखल करत असून अध्यक्षपदाचे ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे (PTI)

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता मल्लिकार्जुन खर्गे हे उमेदवारी दाखल करत असून अध्यक्षपदाचे ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

    • Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता मल्लिकार्जुन खर्गे हे उमेदवारी दाखल करत असून अध्यक्षपदाचे ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

Congress President Election: काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अखेरच्या दिवसापर्यंत अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सुरुवातीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर राज्यात मुख्यमंत्रीपदावरून निर्माण झालेल्या पेचानंतर अखेर त्यांनी माघार घेतली. यानंतर ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी उमेदवारीची घोषणा केली. पण आज मल्लिकार्जुन खर्गे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं जाहीर करताच दिग्विजय सिंह यांनीही निवडणूक लढणार नसल्याचं सांगितलं. मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. तसंच गांधी कुटुंबीयांचे निकटर्तीय मानले जातात. विद्यार्थी नेता म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दिला त्यांनी सुरुवात केली होती. देशातील विविध राज्यात काँग्रेसच्या संकटात मदतीला धावून जाणाऱ्या नेत्यांपैकी एक अशीही त्यांची ओळख आहे.

ट्रेंडिंग न्यूज

UP Mobile Blast News: ईअरफोन लावून बाईक चालवत होती महिला, तितक्यात मोबाईलचा स्फोट झाला अन्...

UP : उत्तर पत्रिकेत 'जय श्रीराम' आणि क्रिकेटपटूंची नावं लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना पास केलं; प्राध्यापकांची हकालपट्टी

Viral News : मैत्रिणीसाठी ऑर्डर केलेला बर्गर मित्राने अर्धा खाल्ला; संतापलेल्या दोस्ताने केली हत्या

Patna Hotels Fire: पाटणा रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल्सना भीषण आग, ६ जणांचा होरपळून मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

मल्लिकार्जुन खर्गे हे गांधी कुटुंबाचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यांच्या एकनिष्ठेचं फळही वेळोवेळी त्यांना पक्षाने दिलं आहे. २०१४ मध्ये लोकसभेत गटनेता केलं होतं. तर २०१९ मध्ये लोकसभेत पराभव झाल्यानंतरही त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. गेल्या वर्षी गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर काँग्रेसने त्यांना राज्यसभेत विरोधी पक्षनेते बनवलं. आता काँग्रेस अध्यक्ष झाल्यास त्यांना विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा लागेल.

विद्यार्थीदशेतच राजकारणाला सुरुवात करणारे खर्गे हे कामगार युनियन संघाचे नेते होते. त्यांनी कामगारांच्या अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले. कर्नाटकात बिदर जिल्ह्यातील वारावत्ती इथं एका शेतकरी कुटुंबात जन्मललेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुलबर्गा इथं आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर सरकारी कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वकीली करण्यास सुरुवात केली होती.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी वयाच्या ३० व्या वर्षी १९७२ मध्ये पहिल्यांदा कर्नाकात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी विजय मिळवला होता. त्याआधी १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये आले होते. २००८ पर्यंत मल्लिकार्जुन खर्गे हे विक्रमी दहा वेळा कर्नाटकात आमदार बनले होते. २००९ मध्ये त्यांनी गुलबर्गा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकून संसदेत पाऊल टाकलं होतं.

२००५ ते २००८ या कालावधीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं होतं. खर्गे यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असून त्यांनी कामगार युनियनचे नेता म्हणून कामगारांसाठी कायद्याची लढाईसुद्धा लढली होती.

मल्लिकार्जुन खर्गे हे कर्नाटकचे असले तर त्यांचे मूळ हे महाराष्ट्रात आहे. ते चांगलं मराठी बोलू शकतात आणि समजूही शकतात. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल यांसारख्या खेळांची आवडही त्यांना आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगासुद्धा राजकारणात असून तो दुसऱ्यांदा आमदार झाला आहे.