मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी, दिग्विजय सिंह यांची अचानक माघार

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी, दिग्विजय सिंह यांची अचानक माघार

Sep 30, 2022, 11:57 AM IST

    • Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काल अर्ज घेऊन गेलेल्या दिग्विजय सिंह यांनी आज सकाळी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. त्यानंतर आता आपण निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं.
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह (फोटो - पीटीआय)

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काल अर्ज घेऊन गेलेल्या दिग्विजय सिंह यांनी आज सकाळी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. त्यानंतर आता आपण निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं.

    • Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काल अर्ज घेऊन गेलेल्या दिग्विजय सिंह यांनी आज सकाळी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. त्यानंतर आता आपण निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं.

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अशोक गेहलोत यांच्या माघारीनंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. गेहलोत यांनी माघार घेतल्यानंतर दिग्विजय सिंह यांचे नाव पुढे आले होते. तसंच आपण अर्ज दाखल करणार असल्याची घोषणाही त्यांनी काल केली होती. दरम्यान, आज अर्ज भरण्याच्या अगोदरच दिग्विजय सिंह यांनी माघार घेतल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्याऐवजी मल्लिकार्जुन खर्गे यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीत उडी मारली आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे आज दुपारी अर्ज दाखल करणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : लहान मुलाने गिळला एलईडी बल्ब! जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची पळापळ! वाचा

Viral News : हनिमूनसाठी बँकॉकला गेली; पतीचे गुपित पुढे आल्याने हैराण झाली पत्नी, उचलले 'हे' पाऊल! वाचा

Prajwal Revanna Case: कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

Jammu Kashmir : हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

दिग्विजय सिंह यांनी म्हटलं की, मी तीन गोष्टींवर कधीच तडजोड करत नाही. पहिली गरी, दलित आणि आदिवासींचे हित. याशिवाय सांप्रदायिकतेविरोधात संघर्ष आणि तिसरा विषय म्हणजे मी गांधी नेहरु कुटुंबाशी एकनिष्ठ आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर मी तुमच्यासोबत आहे. मी स्पष्ट सांगितलं की तुमच्याविरोधात लढण्याचा विचारही करू शकत नाही. त्यामुळे आता मी ठरवलं आहे की त्यांच्या अर्जाला प्रस्तावक म्हणून मी असेन.

मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेत विरोधी पक्षनेते आहेत. आता काँग्रेसमध्ये एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार त्यांना अध्यक्षपदासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा लागेल. वरिष्ठ नेते आणि गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेल्या केसी वेणुगोपाल राव यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाबाबत माहिती दिली. या निवडणुकीत गांधी कुटुंबीय निष्पक्ष राहील आणि खर्गे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभागी होऊ शकतात. जी २३ गटातील प्रमुख सदस्य असणाऱ्या भूपिंदर सिंह हुड्डा यांनीही खर्गे यांच्या उमेदवारीला समर्थन दिलं आहे.

विभाग