मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन कोरोना पॉझिटिव्ह, नियोजित कार्यक्रम रद्द

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन कोरोना पॉझिटिव्ह, नियोजित कार्यक्रम रद्द

Jul 31, 2022, 08:53 AM IST

    • Joe Biden Corona Positive : अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधीही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, परंतु त्यावर त्यांनी मात केली होती.
US President Joe Biden Corona Positive (AP)

Joe Biden Corona Positive : अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधीही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, परंतु त्यावर त्यांनी मात केली होती.

    • Joe Biden Corona Positive : अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधीही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, परंतु त्यावर त्यांनी मात केली होती.

US President Joe Biden Corona Positive : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांच्यात कोणतीही गंभीर लक्षणं नाही, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. बायडन हे काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले होते, त्यानंतर आता त्यांना पुन्हा कोरोनाचं संक्रमण झालं आहे. त्यामुळं आता त्यांचे आगामी आणि नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १ मे रोजी अयोध्या दौऱ्यावर; रामलल्ला दर्शन, शरयू पूजन, असा आहे संपूर्ण कार्यक्रम!

Naxalite Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, तीन महिलांसह १० नक्षलवाद्यांचा खात्मा

Monsoon Update : खुशखबर! यंदा मान्सूनसाठी अनुकूल स्थिती, बरसणारही जोरदार ; ‘या’ दिवशी केरळात धडकणार

विटांची भिंत तोडून भरधाव कार घुसली घरात; ३ जण जखमी, कारचा चक्काचूर, पाहा Viral VIDEO

व्हाईट हाऊसमध्ये काम करणारे बायडन यांचे डॉक्टर केविन ओकॉनर यांनी याबाबतची माहिती जारी केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती बायडन सध्या विलिगीकरणात असून त्यांनी प्रकृती स्थिर आहे, राष्ट्रपती बायडन यांना पाच ते सहा दिवसं विलिगीकरणात ठेवावं लागणार असल्याचीही माहिती त्यांच्या डॉक्टरांनी जारी केलेल्या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कोरोनानं संक्रमित झाले होते, त्यानंतर आता त्यांना या रोगाची पुन्हा लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान आता जगभरातील देशांमध्ये कोरोना रुग्णांचा वाढता टक्का कमी होताना दिसत आहे. भारतात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी मंकीपॉक्सच्या रुग्णांची होणारी रुग्णवाढ ही चिंतेची बाब बनली आहे. आता कोरोना महामारीही संपली असून जगभरात या संक्रमणाचे रुग्ण झपाट्यानं कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

विभाग