मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde: ‘आनंद दिघेंसोबत जे झालं त्याचा मी साक्षीदार, योग्य वेळी बोलणार’

Eknath Shinde: ‘आनंद दिघेंसोबत जे झालं त्याचा मी साक्षीदार, योग्य वेळी बोलणार’

Jul 30, 2022, 06:15 PM IST

    • Eknath Shinde On Anand Dighe : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्कादायक दावा केला आहे.
Maharashtra Chief Minister Eknath Shinde (PTI)

Eknath Shinde On Anand Dighe : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्कादायक दावा केला आहे.

    • Eknath Shinde On Anand Dighe : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्कादायक दावा केला आहे.

Maharashtra Politics Eknath Shinde : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतील बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शिवसेनेतून ४० आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर राज्यातील अनेक शिवसेना नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. त्यामुळं आता शिंदेगट आणि शिवसेनेतील संघर्ष शिगेला पोहचला असतानाच आता मुख्यमंत्री शिंदेंनी एक मोठा आणि धक्कादायक दावा केला आहे. त्यामुळं आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याबाबत जे काही घडलंय त्याचा मी साक्षीदार असून योग्यवेळी त्यावर बोलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. ज्यावेळी मी या विषयावर मुलाखत देईल त्या वेळी राज्यात राजकीय भूकंप होईल, असा इशारा मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिला आहे.

मुख्यमंत्री शिंदे आज नाशिक आणि त्यानंतर औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी नाशिकच्या मालेगावात आल्यानंतर त्यांनी आयोजित सभेला संबोधित केलं. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. मालेगावात आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'अन्यायाविरोधात पेटून उठणं ही बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे, मी आज काही बोलणार नाही पण समोरून जसं तोंड उघडेल तसं मला बोलावं लागेल, धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत जे घडलं त्याचा मी साक्षीदार असून योग्य वेळी मी याबाबात मी योग्य वेळी बोलणार असल्याचं' मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं.

पुढील बातम्या