मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Russia-Ukraine war : जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने; रशिया-युक्रेन युद्धात ‘नाटो’ची उडी

Russia-Ukraine war : जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने; रशिया-युक्रेन युद्धात ‘नाटो’ची उडी

Mar 17, 2023, 12:16 PM IST

  • Russia-Ukraine war : रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनच्या बाजूने असलेल्या नाटोने आता थेट युद्धात उतरण्याची तयारी केली आहे. नाटो देश आतापर्यंत या युद्धापासून दूर होते. मात्र, नाटोचा सदस्य असलेल्या पोलंडने थेट युक्रेनला मदत करण्याचे ठरवले आहे.

Russia-Ukraine war

Russia-Ukraine war : रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनच्या बाजूने असलेल्या नाटोने आता थेट युद्धात उतरण्याची तयारी केली आहे. नाटो देश आतापर्यंत या युद्धापासून दूर होते. मात्र, नाटोचा सदस्य असलेल्या पोलंडने थेट युक्रेनला मदत करण्याचे ठरवले आहे.

  • Russia-Ukraine war : रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनच्या बाजूने असलेल्या नाटोने आता थेट युद्धात उतरण्याची तयारी केली आहे. नाटो देश आतापर्यंत या युद्धापासून दूर होते. मात्र, नाटोचा सदस्य असलेल्या पोलंडने थेट युक्रेनला मदत करण्याचे ठरवले आहे.

Russia-Ukraine war : रशिया-युक्रेन युद्धात नाटो देश छुप्या पद्धतीने युक्रेनची मदत करत होते. तसेच या युद्धापासून अलिप्त राहणार असल्याची भूमिका देखील त्यांनी जाहीर केली होती. मात्र, आता नाटो सदस्य असलेल्या पोलंडने थेट युक्रेनला मदत करण्याचे धोरण अवलंबले आहे. पोलंड युक्रेनला चार मिग २९ लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत आहे. पोलंड नाटो सदस्य असलेला असा एकमेव देश आहे ज्याने उघडपणे युक्रेनला हत्यारे देण्याची घोषणा केली. पोलंडचे राष्ट्रपती आंद्रजेज डूडा म्हणाले, की ही लढाऊ विमाने लवकरच युक्रेनला दिली जाणार आहे. मिग २९ विमाने आता पर्यन्त पोलंडच्या हवाई सीमेची सुरक्षा करत होते. आता आम्ही ही विमाने युक्रेनला देण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Prajwal Revanna: माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल; SIT गठित होताच देशातून फरार

UP Accident : भयंकर अपघात! बसला कापत निघून गेला ट्रक; ७ जणांचा मृत्यू, २५ जखमी

धक्कादायक.. बहिणीच्या हळदीत डान्स करताना तरुणीला हार्ट अटॅक; जागीच मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

Mohan Bhagwat : 'जोपर्यंत गरज आहे, आरक्षणाची मर्यादा वाढवावी...', आरक्षणाच्या वादावर मोहन भागवतांचं मोठं विधान

पोलंडने या निर्णयामुळे शस्त्रास्त्र पुरवठ्यात आघाडी घेतली आहे. पोलंडच्या या निर्णयामुळे नाटोच्या इतर देशावर युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवण्यासंदर्भात दबाव वाढला आहे. आता पर्यंत नाटो देश हे युक्रेनचे केवळ समर्थन करत होते. युक्रेनला थेट शस्त्रास्त्र देण्यासंदर्भात हे देश दोन हात लांब होते. जर पोलंड प्रमाणे इतर नाटो देशांनी जर युक्रेनला हत्यारे देण्यासंदर्भात पावले उचलली तर जगावर तिसऱ्या युद्धाचे संकट घोंगावणार आहे. पोलंड सोबत चेक रिपब्लिक या देशाने सुद्धा युक्रेनला मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.

पोलंड आणि रशियाचे आहे शत्रुत्व

युक्रेन युद्धा पूर्वीपासून पोलंड रशियावर थेट आरोप करणारा एकमेव देश आहे. पोलंड रशियाला शीत युद्धाच्या काळात ज्या नजरेने पहिले जात होते त्याच दृष्टिकोनातून पाहतो आहे. ब्लादमिर पुतीन सुद्धा पोलंडला रशियाचा विरोधक मानतात. पोलंडच्या निर्णयामुळे अमेरिका अद्याप प्रभावित झालेला नाही. युक्रेनला लढाऊ विमाने देण्याचा पोलंडचा निर्णय हा त्याचा स्वत:चा आहे असे अमेरिकेचे म्हणणे आहे.

रशिया युक्रेन युद्धाला २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले. एक वर्ष उलटूनही दोन्ही देशातील युद्ध सुरूच आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक भागांवर ताबा मिळवला आहे. हा भूभाग लवकरच रशिया आपल्या देशात सामील करून घेणार आहे.

विभाग