Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर भीषण अपघात ! कारची ट्रकला धडक, तिघे जागीच ठार
Accident on Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर मार्गावर उर्से टोलनाक्याजवळ आढे गावाच्या हद्दीत आज सकाळी ८ च्या सुमारास भीषण अपघातात झाला. एक कार पाठीमागून ट्रकला धडकली असून यात तिघांचा मृत्यू झाला.
पुणे : मुंबईपुणे एक्सप्रेस वे वर आज सकाळी ८ च्या सुमरास भीषण अपघात झाला. हा अपघात आढे गावाच्या हद्दीत किलोमीटर 82 जवळ झाला. एक भरधाव वेगात असलेली कार समोर जाणार्या मालवाहू ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला.
ट्रेंडिंग न्यूज
मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कार क्र. (MH 04 JM 5349) ही आढे गावाजवळील किमी 82 जवळ भरधाव वेगात आली. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोर जाणारा ट्रक क्र. (RJ 09 JB 3638) ला या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की कार टँकर ट्रकच्या मागे रुतून बसली. या अपघात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर या मार्गावर वाहतूक कोंडी होती.
Stray Dogs : पुण्यात मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; सायकलचे हँडल पोटात घुसून आतडे बाहेर
अपघाताची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी जात अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. दरम्यान, अपघात ठार झालेल्या नागरिकांची नावे अद्याप समजू शकली नाही. कर मधील चालकासह दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती समजताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा व महामार्ग पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने वाहने बाजुला करत कार मधील सर्वांना बाहेर काढले.