नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी लंडन येथे केलेल्या व्यक्तव्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांचे लोकसभेतून निलंबन करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. या साठी विशेष चौकशी समितीची स्थापन करण्याची मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे भाजपच्या खासदारांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी लंडन येथे असतांना भारतातील लोकशाही वरुन गंभीर आरोप सरकारवर केले होते. राहुल गांधी यांनी विदेशी भूमीवरून देशा विरोधात वक्तव्य केल्याचा आरोप करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदारांनी केली होती. यावरून ते आक्रमक झाले आहेत. या बाबद्दल कायदा मंत्री किरण रिजिजू म्हणाले, हा केवळ हक्कभंगाचा मुद्दा नसून हे प्रकरण त्यापेक्षा मोठे आहे. या संदर्भात इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या एका रिपोर्टनुसार म्हटले आहे की, २००५मध्ये प्रश्न विचारण्यासाठी खासदारांनी पैसे घेण्याच्या प्रकरणी स्थापन झालेल्या चौकशी समितीच्या धर्तीवर ही समिती स्थापन करावी, अशी मागणी भाजपने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे. ही समिती स्थापन करण्यासाठी भाजपकडे बहुमत आहे. ही समिती एका महिन्यात आपला अहवाल देते.
दरम्यान, २००५मध्ये काँग्रेस नेते पवनकुमार बन्सल यांच्या नेतृत्वाखालील समितीने आरोपींची चौकशी करून १० जणांची खासदारकी रद्द केली होती.
कारवाई करण्यासाठी सरकार सज्ज
कायदा मंत्री किरण रिजिजू म्हणाले की, देशासंबंधी एखादी गोष्ट ही सर्वासाठी चिंतेची बाब असते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले व्यक्तव्य देखील गंभीर आहे. देशाचा अपमान झाला तर आम्ही गप्प बसणार नाही. यांचा पक्ष या विरोधात सर्व नियम आणि परंपरा तपासून पाहणार असून या प्रकरणी कारवाईची मागणी करणार आहोत. राहुल गांधी यांनी भारता विरोधी भाषा वापरली आहे, असा आरोप रिजिजू यांनी केला. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी यापूर्वीच लोकसभा अध्यक्षांकडे राहुल गांधींविरोधात २२३ नियमांतर्गत हक्कभंगाची नोटीस दिली आहे. यावर राहुल गांधी म्हणाले, भाजपने केलेले आरोप हे चुकीचे आहेत. गुरुवारी गांधी म्हणाले, मी भारता विरोधी कुठलेच वक्तव्य केलेले नाही. मला या संदर्भात परवानगी मिळाल्यास संसदेत बोलेन.
राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांची नोटिस
राहुल गांधी यांना दिल्ली पॉलिसांनी लैंगिक शोषणा प्रकरणी नोटिस दिली आहे. भारत जोडो यात्रेत काश्मीर येथे असतांना ही घटना घडली. या प्रकरणी पोलिस कायदेशीर कारवाई करण्याच्या मनस्थितीत आहे.
संबंधित बातम्या