मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kiren Rijiju : देशभरात न्यायाधीशांची २१६ पदं रिक्त; कायदा मंत्र्यांनी दाखवलं कॉलेजियमकडं बोट
Kiren Rijiju
Kiren Rijiju (HT_PRINT)

Kiren Rijiju : देशभरात न्यायाधीशांची २१६ पदं रिक्त; कायदा मंत्र्यांनी दाखवलं कॉलेजियमकडं बोट

17 March 2023, 9:18 ISTNinad Vijayrao Deshmukh

Vacancies In High Court Judges : देशातील उच्चन्यायालयातील न्यायाधीशांची तब्बल २१६ पदे रिक्त असल्याची माहिती केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी संसदेत दिली.

Kiren Rijiju On High Court Judges Vacancy : कॉलेजियमच्या परवानगी न मिळाल्याने देशातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची तब्बल २१६ पदे रिक्त असल्याची माहिती केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी राज्यसभेत दिली. उच्च न्यायालयांमध्ये १ हजार ११४ न्यायाधीशांची पदे मंजूर आहेत. त्यातील केवळ ७८० पदे भरलेली असून ३३४ पदे ही रिक्त आहेत. उच्च न्यायालयांमधील या पदभरतीसाठी उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या ११८ शिफारशी टप्प्याटप्प्याने असून २१६ रिक्त जागांसाठी सरकारला अद्याप शिफारसी मिळालेल्या नसल्याचे रिजिजू यांनी स्पष्ट केले.

ट्रेंडिंग न्यूज

किरेन रिजिजू म्हणाले, उच्च न्यायालयात न्यायाधीशांची ३१४ पदे रिक्त आहेत. न्यायाधीशांची पदे भरण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ही पदे भरण्यासाठी प्रस्ताव पाठवला असून यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक आणि महिला यांच्यातील योग्य उमेदवारांचा विचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २१६ रिक्त जागांसाठी सरकारला अद्याप कॉलेजियमच्या शिफारसी मिळालेल्या नाहीत. १० मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात एकही जागा रिक्त नव्हती. २५ उच्च न्यायालयांमध्ये १ हजार ११४ न्यायाधीशांची मंजूर संख्या आहे, त्यापैकी ७८० पदांवर न्यायाधीश कार्यरत असून ३३४ पदे ही रिक्त आहेत.

रिजिजू म्हणाले, देशभरात न्यायव्यवस्था भक्कम करण्यासाठी तसेच सार्वजनिक हितासाठी सर्व बदल्या करणे गरजेचे आहे. एका उच्च न्यायालयातून न्यायाधीशांच्या बदलीसाठी मेमोरँडम ऑफ प्रोसिजर मध्ये कोणतीही कालमर्यादा नाही, असेही ते म्हणाले.

विभाग