Zojila Pass opens : लष्करानं करून दाखवलं ! सामरिकदृष्ट्या महत्वाची असलेली झोझिला, राझदान खिंड अखेर खुली
Zojila Pass opens : लष्कराच्या बॉर्डर रोड ऑर्गनाईझेशनने एक महत्वाची कामगिरी केली आहे. बर्फाच्छादित झोझिला आणि राझदान पास खुली करून लडाख आणि गुरेझ व्हॅलीशी संपर्क पुन्हा स्थापन केला आहे. सामरिक दृष्ट्या ही पास अतिशय महत्वाची आहे. श्रीनगर-कारगिल-लेह रस्ता (NH-1) तब्बल ११ हजार ६५० फूट उंचीवर आहे आणि काश्मीर खोरे आणि लडाखला जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे. हा रस्ता बर्फामुळे दरवर्षी ऑक्टोबर/नोव्हेंबरपर्यंत बंद राहायचा. मात्र, लष्कराने हा रस्ता आता मार्च मध्येच खुला केला आहे.
(1 / 5)
हिवाळ्यात बर्फामुळे श्रीनगर-कारगिल-लेह रस्ता हा बंद बसतो. याच मार्गावर सामरिकदृष्ट्या अतिशय महत्वाची असलेली झोझिला आणि राझदान खिंड आहे. बर्फामुळे या दोन्ही खिंड बंद होत असल्याने काश्मीर आणि लडाखचा संपर्क तुटत होता. आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पर्यन्त हा मार्ग बंद राहायचा. (Waseem Andrabi /Hindustan Times)
(2 / 5)
सध्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने पायाभूत सुविधांवर भर दिल आहे. तसेच उत्तरेकडील सीमांशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाथी रस्ते बांधणीवर भर दिला आहे. हिवाळ्यात झोझिला पास खुली करण्यासाठी BRO ने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. (Waseem Andrabi /Hindustan Times)
(3 / 5)
या वर्षी ०६ जानेवारी पर्यंत झोझिला पास वाहतुकीसाठी खुली ठेवण्यात आली होती. त्यानंतर बर्फामुळे हा मार्ग बंद झाला. साधारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पर्यन्त बंद असणारा हा मार्ग बीआरओने मार्च महिन्यातच खुला केला आहे. (Waseem Andrabi /Hindustan Times)
(4 / 5)
गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक हिमवृष्टी झालेल्या भागात रस्ते खुले ठेवण्याचे आव्हान BRO ने स्वीकारले. त्याचाच एक भाग म्हणून झोझिला पास तातडीने सुरू करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात झोझिलाच्या सोनमर्ग आणि द्रास टोकांपासून प्रोजेक्ट बीकन आणि प्रोजेक्ट विजयक अंतर्गत पथकांना सज्ज करून हा मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू झाले. ११ मार्च २०२३ रोजी झोझिला पासवर खुली करण्यात आली. येथील रस्त्याचे रुंदीकर करण्यात आले आणि १६ मार्च पासून हा मार्ग खुला करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही खिंड यावर्षी केवळ ६८ दिवस बंद राहिली.(Waseem Andrabi /Hindustan Times)
(5 / 5)
गुरेझ सेक्टर आणि काश्मीर खोऱ्यातील एकमेव रस्ता जोडणारा राझदान खिंड देखील अवघ्या ५८ दिवसांच्या अंतरानंतर पुन्हा खुली करण्यात आली आहे. साधना, फर्कियां गली आणि जमीनदार गली येथील इतर महत्त्वाचे रस्ते ही संपूर्ण हिवाळ्यात बीआरओने खुले ठेवले. (Waseem Andrabi /Hindustan Times)
इतर गॅलरीज