मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Prajwal Revanna: माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल; SIT गठित होताच देशातून फरार

Prajwal Revanna: माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल; SIT गठित होताच देशातून फरार

Apr 28, 2024, 07:38 PM IST

  • JDS MP Prajwal Revanna : कर्नाटक सरकारद्वारे या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी गठित केल्यानंतर प्रज्वल रेवन्ना देश सोडून पळाला आहे. प्रज्वल रेवन्ना भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आहे.

जेडीएस खासदार प्रज्वल रेवन्ना

JDS MP Prajwal Revanna : कर्नाटक सरकारद्वारे या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी गठित केल्यानंतर प्रज्वल रेवन्ना देश सोडून पळाला आहे.प्रज्वल रेवन्ना भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आहे.

  • JDS MP Prajwal Revanna : कर्नाटक सरकारद्वारे या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी गठित केल्यानंतर प्रज्वल रेवन्ना देश सोडून पळाला आहे. प्रज्वल रेवन्ना भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आहे.

कर्नाटक राज्यातील हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल सेक्युलर (JDS) चे खासदार प्रज्वल रेवन्ना (Jds mp Prajwal revanna) यांच्याशी संबंधित सेक्स स्कँडलचा प्रकार समोर आला आहे. सूत्रांनी दावा केला की, कर्नाटक सरकारद्वारे या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी गठित केल्यानंतर प्रज्वल रेवन्ना देश सोडून पळाला आहे.प्रज्वल रेवन्ना भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (deve gowda grandson prajwal revanna) यांचा नातू आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Hanooman AI : भारताचे पहिले स्वदेशी AI टूल ‘हनुमान’ लाँच, मोफत वापरण्याची जाणून घ्या ट्रिक

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल यांना मारहाण, तक्रार दाखल

POK News : भारतात विलीन करा नाही तर स्वतंत्र करा! पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक पुन्हा रस्त्यावर

सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, गुणपत्रिका 'अशी' पाहा ऑनलाइन!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मुख्यमंत्री सिद्धारमय्या सरकारने महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या मागणीवर या प्रकरणी एसआयटी गठित करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रज्वल रेवन्ना आज (रविवारी) सकाळी बेंगळुरुहून जर्मनीच्या फ्रैंकफर्टकडे रवाना झाले आहेत. त्याचबरोबर जेडीएसने सकाळी ११ वाजता पक्ष कार्यालयात एक तातडीची पत्रकार परिषद बोलावण्यात आली.

हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या सेक्स स्कँडलवरुन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात खळबळ उडाली आहे. कर्नाटक सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी गठित करताच प्रज्वल रेवन्ना देश सोडून पळून गेल्याचे सांगितले जात आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या मागणीवरून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश शनिवारी दिले होते. यानंतर प्रज्वल रेवन्ना जर्मनीला रवाना झाले.

जेडीएस खासदार रेवन्ना यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ माजली होती. व्हिडिओ समोर आल्यानंतर कर्नाटक सरकारने चौकशी सुरु केली आहे.विशेष म्हणजे रेवन्ना ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते तिथे शुक्रवारी मतदान पार पडलं. मात्र त्याआधी दोन दिवस हे अश्लिल व्हिडीओव्हायरल झाले होते.

दरम्यान जेडीएस व भाजपाचे निवडणूक प्रभारी पूर्णचंद तेजस्वी एमजी यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत म्हटले आहे की, नवीन गौडा यांच्यासह अन्य लोकांनी रेवन्ना यांना बदनाम करण्याच्या उद्देश्याने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

एफआयआरमध्ये म्हटले आहे की, नवीन गौडा व अन्य लोकांनी व्हिडिओ व फोटोत एडीट करून प्रज्वल रेवन्ना यांना बदनाम करण्यासाठी हे फोटो व व्हिडिओ हसन लोकसभा मतदारसंघात पेन ड्राइव, सीडी आणि व्हॉट्सएपच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवले. हे लोक रेवन्ना यांना मतदान न करण्याचे आवाहन जनतेला करत आहेत.

पुढील बातम्या