देशात लोकसभा निवडणुकीची (lok sabha Election 2024) रणधुमाळी सुरू असून आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं आहे. आज महाविकास आघाडीची सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारार्थ सासवडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे ज्या पद्धतीने देश चालवत आहेत, ते पाहून चिंता वाटते, अशी टिप्पणी शरद पवारांनी यावेळी म्हटले.
शरद पवारांनी सासवडच्या सभेत मोदीबरोबरच भाजपच्या अन्य नेत्यांवर टीका केली. पवार म्हणाले आज मोदीसाहेब आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत. हे पाहिल्यानंतर काळजी वाटते.
शरद पवार म्हणाले, यावेळची लोकसभेची निवडणूक अन्य निवडणुकांहून वेगळी आहे. हा देश कशा पद्धतीने चालवायचा, हा प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आज पंतप्रधान मोदी व त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत,ते पाहिल्यानंतर चिंता वाटते. देश चालवणे म्हणजे लोकशाही मार्गाने, लोकांना विश्वासात घेऊन सर्वांच्या सहमतीने देशाचा कारभार करणे ही लोकशाहीची गरज आहे. मात्र आज चित्र वेगळे दिसते.
स्थानिक पातळीवर काय परिस्थिती आहे. पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आहेत का?जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आहेत का? नगर पालिकेच्या निवडणुका झाल्या का? किती दिवसांपासून या निवडणुका झाल्या नाहीत. या संस्था किती दिवसांपासून लोकप्रतिनिधींविना आहे. स्थानिक पातळीवर ही स्थिती असेल तर काही दिवसांनी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकाही न घेण्याची दुर्बुद्धी या राज्यकर्त्यांना सुचणार नाही, कशावरून?
भाजपला देशाची राज्य घटना बदलायची आहे. त्यामुळेच त्यांनी ४०० पारचा नारा दिला आहे. त्यांच्या खासदारांनी याची कबुली दिली आहे. पीएम मोदी ठिकठिकाणी जातात आणि भाषण करतात. एकदा त्यांनी दिल्लीत भाषण करताना म्हटले की, शरद पवारांनी शेतीच्या क्षेत्रात ऐतिहासिक काम केलं आहे. तसंच,पवारांचा हात धरुन मी राजकारणात पावलं टाकली, असं देखील ते म्हणाले होते. टीका करायचा त्यांचा अधिकार आहे.,असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला.
ज्यांनी जलसिंचनाबाबत आरोप केले. घोटाळ्याचे आरोप केले. ते आज सगळे कुठे आहेत? यावरून तुम्हाला मोदींच्या बोलण्याचा अर्थ कळला असेल. हुकुमशाहीला निमंत्रण देणाऱ्या प्रवृत्तीला बाजूला ढकलायचे असेल तर याचा पराभव केला पाहिजे.
संबंधित बातम्या