मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi News: दिल्ली हादरली ! भरधाव ट्रकने दुभाजकावर झोपलेल्या नागरिकांना चिरडले; ४ ठार, २ जखमी

Delhi News: दिल्ली हादरली ! भरधाव ट्रकने दुभाजकावर झोपलेल्या नागरिकांना चिरडले; ४ ठार, २ जखमी

Sep 21, 2022, 09:00 AM IST

    • Delhi Road Accident News : दिल्ली येथे मोठी घटना घडली आहे. दुभाजकावर झोपले असेलेल्या नागरिकांना भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने चिरडले. यात चौघांचा मृत्यू झाला आहे.
Delhi Road Accident News

Delhi Road Accident News : दिल्ली येथे मोठी घटना घडली आहे. दुभाजकावर झोपले असेलेल्या नागरिकांना भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने चिरडले. यात चौघांचा मृत्यू झाला आहे.

    • Delhi Road Accident News : दिल्ली येथे मोठी घटना घडली आहे. दुभाजकावर झोपले असेलेल्या नागरिकांना भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने चिरडले. यात चौघांचा मृत्यू झाला आहे.

दिल्ली : दिल्ली येथे बुधवारी मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका रस्ते अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. एका भरधाव वेगात असेलल्या ट्रक चालकामुळे हा अपघात झाला आहे. ट्रक भरधाव असल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकांवर झोपले असलेल्या ६ नागरिकांच्या अंगावरून हा ट्रक गेला. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे.

ट्रेंडिंग न्यूज

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

IITमध्ये शिकणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; २० वर्षातली धक्कादायक आकडेवारी जाहीर

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जातेय खिल्ली, VIDEO

या घटनेचे वृत एनआयएने दिले आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका भरधाव वेगात असलेल्या ट्रकने पहाटे १ वाजून ५१ मिनिटांनी दुभाजकावर झोपेले असलेल्या नागरिकांना चिरडले. यात ४ जण ठार झाले आहेत. ही घटना सीमापुरी येथे डीटीसी डिपोट रेडलाइट ओलांडताना या ट्रक चालकाने रस्त्या शेजारी असणाऱ्या दुभाजकावर झोपले असलेल्या नागरिकांना चिरडले. या नंतर थांबण्या एवजी हा ट्रक पुढे निघून गेला. घटनास्थळावर दोघांचा तर एकाचा दवाखान्यात पोहचताच मृत्यू झाला. तर चौथा व्यक्तीचा मृत्यू हा उपचारा दरम्यान झाला.

या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. अंधाराचा फायदा घेऊन ट्रक चालक हा फरार झाला आहे. पोलिस आरोपी ट्रक चालकाचा शोध घेत आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची ओळख पटली आहे. यात करीम (वय ५२), छोटे खान (वय २५), शाह आलम (वय ३८), राहुल (वय ३८) अशी मृतांची नावे आहेत. तर मनीष (वय १६), प्रदीप (वय ३०) हे जखमी झाले आहेत. ट्रक चालकाचा शोध घेण्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.