मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  New Zealand Earthquake : भीषण भूकंपानं न्यूझीलंड हादरलं, घाबरलेल्या नागरिकांची मोठी धावपळ

New Zealand Earthquake : भीषण भूकंपानं न्यूझीलंड हादरलं, घाबरलेल्या नागरिकांची मोठी धावपळ

Feb 15, 2023, 02:38 PM IST

    • New Zealand Earthquake : तुर्कीतील भूकंपाची घटना ताजी असतानाच आता न्यूझीलंडमध्येही भीषण भूकंपाचे हादरे बसल्याची घटना समोर आली आहे.
Earthquake New Zealand Today (HT)

New Zealand Earthquake : तुर्कीतील भूकंपाची घटना ताजी असतानाच आता न्यूझीलंडमध्येही भीषण भूकंपाचे हादरे बसल्याची घटना समोर आली आहे.

    • New Zealand Earthquake : तुर्कीतील भूकंपाची घटना ताजी असतानाच आता न्यूझीलंडमध्येही भीषण भूकंपाचे हादरे बसल्याची घटना समोर आली आहे.

Earthquake New Zealand Today : तुर्की, सीरिया आणि इराणमधील भीषण भूकंपामुळं आतापर्यंत तब्बल ३८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपामुळं संपूर्ण जगभरात शोक व्यक्त केला जात असतानाच आता न्यूझीलंडमध्येही भीषण भूकंप झाल्याची घटना समोर आली आहे. न्यूझीलंडमधील लोअर हटपासून ७८ किमी वायव्येच्या दिशेनं ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. याशिवाय राजधानी वेलिंग्टनच्या दोन्ही तटांवर भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपात कोणतीही जीवीत अथवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळं आता तुर्कीनंतर न्यूझीलंडमध्येही भीषण भूकंप झाल्यामुळं संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

न्यूझीलंडमधील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास भूकंप झाला असून त्यानंतर सलग ३० सेकंदांपर्यंत भूकंपचे धक्के बसत होते. न्यूझीलंड सरकारच्या भूकंपीय मॉनिटर जियोनेटने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचं केंद्र जमिनीत ४८ किलोमीटर खोलवर होतं. त्यानंतर राजधानी वेलिंग्टनसह देशातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता न्यूझीलंड सरकारनं भूकंपग्रस्त क्षेत्रांमध्ये मदत व बचावकार्य सुरू केलं आहे. याशिवाय भूकंप झाल्याचं समजताच अनेक नागरिकांनी जीवाच्या आकांतानं घराबाहेर धाव घेतली. घाबरलेले नागरीक गेल्या अनेक तासांपासून उघड्यावर बसलेले असल्याची माहिती आहे.

चक्रिवादळानंतर भूकंपाच्या धक्क्यांनी जनजीवन विस्कळीत...

गेल्या ४८ तासांपासून न्यूझीलंडच्या समुद्रकिनाऱ्यांवर चक्रिवादळानं थैमान घातलं आहे. सरकारनं किनाऱ्यावरील शहरांमध्ये मदत व बचावकार्य सुरू केलेलं असतानाच आता न्यूझीलंडमध्ये भूकंप झाल्याची घटना समोर आल्यामुळं देशातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. चक्रिवादळामुळं ११ हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलं असून त्यानंतर आता भूकंपामुळं मोठी जीवीत आणि वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.