मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  BBC IT Raid : ‘तपास अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यालयात...’, आयटीच्या छाप्यानंतर बीबीसीची प्रतिक्रिया

BBC IT Raid : ‘तपास अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यालयात...’, आयटीच्या छाप्यानंतर बीबीसीची प्रतिक्रिया

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 14, 2023 07:26 PM IST

IT Raid On BBC Office : आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर आता बीबीसीनं अधिकृत स्पष्टीकरण जारी केलं आहे.

IT Raid On BBC Office In Delhi And Mumbai
IT Raid On BBC Office In Delhi And Mumbai (HT)

IT Raid On BBC Office In Delhi And Mumbai : आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुपारपासून बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांवर छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळं या कारवाईवरून विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. याशिवाय इडिटर्स गिल्ड ऑफ इंडियानंही बीबीसीवरील कारवाईचा निषेध केला आहे. कायद्याचं उल्लंघन झाल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येत असल्याचं आयकर विभागानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. परंतु आता दुपारपासून सुरू असलेल्या आयटी विभागाच्या कारवाईवर आता बीबीसीनं अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळं आता त्यावरून तर्कवितर्क लावले जात आहे.

बीबीसीनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, आयकर विभागाचे अधिकारी अजूनही आमच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात आहेत. आम्ही तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत असून ही परिस्थिती लवकरात लवकर निवळेल, अशी आशा आहे, असं बीबीसीनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. आयकर विभागानं छापेमारी सुरू केल्यानंतर बीबीसीच्या कार्यालयातील पत्रकार आणि कर्माचाऱ्यांना फोन आणि कम्प्यूटर सिस्टम वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना स्वत:चेही फोन वापरू दिलं जात नसल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.

आयकर विभागानं बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर बीबीसीनं कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीनं काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. याशिवाय जे कर्मचारी कार्यालयातून काम करत आहेत त्यांना तातडीनं कार्यालय सोडण्यास कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता आयकर विभागाची कारवाई कधीपर्यंत चालणार आणि त्यातून कोणत्या गोष्टी समोर येणार, याकडे भारतासह संपूर्ण जगभराचं लक्ष लागलेलं आहे.

IPL_Entry_Point