मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  फूट शिवसेनेत नव्हे, सभागृहात पडलीय; नबाम राबिया प्रकरण कसं लागू होईल?; ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद

फूट शिवसेनेत नव्हे, सभागृहात पडलीय; नबाम राबिया प्रकरण कसं लागू होईल?; ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 15, 2023 02:22 PM IST

Maharashtra Political Crisis : शिंदे गटाचे वकील हरिश साळवे आणि नीरज किशन कौल यांचे युक्तिवाद फेटाळून लावत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेत फूटच पडली नसल्याचा दावा केला आहे.

Supreme Court Hearing On Maharashtra Political Update Live
Supreme Court Hearing On Maharashtra Political Update Live (HT)

Supreme Court Hearing On Maharashtra Political Update Live : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. सकाळपासून शिंदे गटाकडून जेष्ठ विधिज्ञ हरिश साळवे आणि नीरज किशन कौल यांनी जोरदार युक्तिवाद करत शिंदे गटाच्या आमदारांवर पक्षांतरबंदी कायदा लागू होत नसल्याचं म्हटलं आहे. याशिवाय विधानसभा उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आलेला असताना ते अपात्रतेचा निर्णय घेऊ शकत नाहीत, असाही दावा शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाचे अनेक युक्तिवाद खोडून काढत नवाच दावा केला आहे. शिवसेना पक्षात फूट पडलेली नाही, सभागृहात फूट पडली आहे, असं म्हणत कपिल सिब्बल यांनी या प्रकरणात नवाम राबियाची केस लागू होणार नसल्याचा दावा केला आहे.

ठाकरे आणि शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पीएस नरसिंह यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद करण्यात येत आहे. शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर त्याला उत्तर देताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की, शिवसेनेत फूट पडलेली नाही, सभागृहात फूट पडलेली आहे आणि पक्षांतर योग्य आहे की नाही, हे सभागृहात ठरवलं जाऊ शकत नाही. त्यामुळं शिंदे गटाच्या वकिलांनी सत्तासंघर्षाच्या प्रकरणांत केलेले युक्तिवाद लागू होणार नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता दोन्ही गटाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

आणखी दोन वकील करणार युक्तिवाद...

सुप्रीम कोर्टात ठाकरे आणि शिंदे गटाच्या बाजूनं युत्तिवाद करण्यात आले आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्याकडून महेश जेठमलानी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे युक्तिवाद करणार आहेत. दुपारच्या ब्रेकसाठी कोर्टातील सुनावणी थांबवण्यात आली असून पुन्हा सुनावणी सुरू झाल्यानंतर हे दोन्ही वकील युक्तिवाद करणार आहेत.

IPL_Entry_Point