मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Stock Market: अवघ्या तीन दिवसांत लाखाचे दीड लाख; टाटाच्या ‘या’ कंपनीनं केलं मालामाल

Stock Market: अवघ्या तीन दिवसांत लाखाचे दीड लाख; टाटाच्या ‘या’ कंपनीनं केलं मालामाल

Sep 02, 2022, 11:01 AM IST

    • TTML Share Price: टाटा समूहाच्या टीटीएमएल कंपनीचा शेअर भलताच वधारला असून गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.
TTML Share Price

TTML Share Price: टाटा समूहाच्या टीटीएमएल कंपनीचा शेअर भलताच वधारला असून गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

    • TTML Share Price: टाटा समूहाच्या टीटीएमएल कंपनीचा शेअर भलताच वधारला असून गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

TTML Share Price: मागील काही दिवसांत शेअर बाजार कोसळताना दिसत असला तरी टाटा समूहाच्या टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीच्या शेअरनं जोरदार उसळी घेत गुंतवणूकदारांना 'अच्छे दिन' दाखवले आहेत. अवघ्या तीन दिवसांत या कंपनीचा शेअर दीड पटीनं वाढला आहे. त्यामुळं या कंपनीत एक लाखाची गुंतवणूक केलेल्या शेअरहोल्डर्सना दीड लाखांपेक्षाही अधिक रिटर्न्स मिळाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Punjab Haryana High Court : वृद्ध सासूबरोबर राहण्यास सुनेचा नकार, हायकोर्टानं मंजूर केला नवऱ्याचा घटस्फोटाचा अर्ज

israel hamas war : इस्रायलनं राफामध्ये हल्ल्याची तयारी करताच हमासनं टेकले गुडघे! म्हणाले, युद्धबंदीसाठी तयार

Viral news : किडनी स्टोन दूर करण्यासाठी दररोज २ लिटर लघवी प्या, गुगल एआयनं दिलं धक्कादायक उत्तर

Sunita Williams : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांच्या तिसऱ्या अंतराळ प्रवासात विघ्न; उड्डाण स्थगित! काय आहे कारण?

मागील तीन दिवसांत टीटीएमएलच्या शेअरच्या किंमतीत ५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या ५२ आठवड्यात टीटीएमएलच्या शेअरनं ३३.०५ रुपयांवरून २९०.१५ रुपयांपर्यंत मजल मारली होती. आज सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजारात कंपनीच्या शेअरचा भाव ८ टक्क्यांनी वाढून १३९.५० रुपयांवर पोहोचला होता. मागील तीन दिवसांत दोन वेळा या शेअरला अपर सर्किट लागलं होतं.

टीटीएमएलच्या शेअरमध्ये सातत्यानं चढउतार पाहायला मिळत आहेत. ११ जानेवारी २०२२ रोजी हा शेअर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर होता. त्यावेळी अनेक गुंतवणूकदार नफा घेऊन बाहेर पडले. यंदा टीटीएमएलच्या शेअरने आतापर्यंत ३१.८९ टक्के निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत. असं असलं तरी मागच्या तीन वर्षांत या शेअरनं गुंतवणूकदारांना ५६५३ टक्के रिटर्न दिले आहेत. मागच्या पाच वर्षांत १९६०.६७ टक्के तर दहा वर्षांत १२२७ टक्के रिटर्न दिले आहेत.

विभाग