मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Whatsapp New Features : आता स्मार्टवॉचवरूनही होणार व्हिडिओ कॉल; पाहा काय आहे व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फीचर

Whatsapp New Features : आता स्मार्टवॉचवरूनही होणार व्हिडिओ कॉल; पाहा काय आहे व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फीचर

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 01, 2022 01:24 PM IST

Whatsapp New Features For Smartwatch : व्हॉट्सअ‍ॅपनं स्मार्टवॉच वापरणाऱ्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणलं आहे. सॅमसंगची स्मार्टवॉच वापरणाऱ्या युजर्सला या फीचर्सचा आनंद घेता येणार आहे.

Whatsapp New Features For Smartwatch
Whatsapp New Features For Smartwatch (HT)

Whatsapp New Features For Smartwatch : व्हॉट्सअ‍ॅपनं युजर्ससाठी एक धमाकेदार फीचर लॉन्च केलं आहे. स्मार्टवॉच वापरणाऱ्या युजर्सला आता त्यावरून व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल घेता येणार आहे. Wear OS 3 ची सुविधा असलेल्या स्मार्चवॉचसाठी हे फीचर रोलआउट करण्यात आलं असून त्यात Samsung Galaxy Watch 4 आणि Samsung Galaxy Watch 5 या स्मार्टवॉचचा वापर करणाऱ्या युजर्सला या फीचरचा फायदा घेता येणार आहे. त्यामुळं आता युजर्सला स्मार्टफोनशिवाय व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल करता येईल.

व्हॉट्सअ‍ॅपनं जारी केलेलं हे फीचर सध्या अ‍ॅंड्रॉईडच्या बीटा व्हर्जनमध्ये देण्यात आलं असून हे फीचर अ‍ॅंड्रॉईडच्या 2.22.19.11 आणि 2.22.19.11 मध्ये आधीपासूनच देण्यात आलेलं आहे. त्यामुळं आता Wear OS 3 ची सुविधा असलेल्या स्मार्टवॉचमध्ये व्हिडिओ कॉल आल्यानंतर युजर्सला व्हॉट्सअ‍ॅपचा लोगो दिसेल, त्यानंतर युजर्सला स्मार्टवॉचवर व्हिडिओ कॉलचा आनंद घेता येणार आहे. यासाठी सॅमसंगच्या स्मार्टवॉचमध्ये युजर्सना व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलसाठी वेगळा इंटरफेस देण्यात आला असून व्हिडिओ कॉल आल्यानंतर त्याला रिसीव्ह किंवा रिजेक्ट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टवॉच 5 ला गूगल पिक्सल ६ स्मार्टफोनला पेयर केल्यानंतर त्यात व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलचा ऑप्शन दिसत नसल्याची तक्रार अनेक युजर्सनी केली होती. त्यामुळं व्हॉट्सअ‍ॅपकडून प्रकाराचीही दखल घेण्यात आली असून त्यासाठी लवकरच एक नवीन फीचर रोलआउट करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

IPL_Entry_Point