मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  israel hamas war : इस्रायलनं राफामध्ये हल्ल्याची तयारी करताच हमासनं टेकले गुडघे! म्हणाले, युद्धबंदीसाठी तयार

israel hamas war : इस्रायलनं राफामध्ये हल्ल्याची तयारी करताच हमासनं टेकले गुडघे! म्हणाले, युद्धबंदीसाठी तयार

May 07, 2024, 02:04 PM IST

  • Israel hamas war update : हमासचे राजकीय प्रमुख इस्माईल हनीये यांनी कतार आणि इजिप्तला युद्धविराम करार मान्य करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. इस्त्रायलने रफाहवर हल्ल्याची तयारी केली असून त्यामुळे हमास नरमलाआहे.

राफामध्ये इस्रायलच्या हल्ल्याच्या तयारी नंतर हमासने टेकले गुडघे! म्हणाले- युद्धबंदीसाठी तयार

Israel hamas war update : हमासचे राजकीय प्रमुख इस्माईल हनीये यांनी कतार आणि इजिप्तला युद्धविराम करार मान्य करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. इस्त्रायलने रफाहवर हल्ल्याची तयारी केली असून त्यामुळे हमास नरमलाआहे.

  • Israel hamas war update : हमासचे राजकीय प्रमुख इस्माईल हनीये यांनी कतार आणि इजिप्तला युद्धविराम करार मान्य करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. इस्त्रायलने रफाहवर हल्ल्याची तयारी केली असून त्यामुळे हमास नरमलाआहे.

Israel-Hamas war news : इस्त्रायली सैन्याने रफाहमध्ये हल्ले सुरू केल्यानंतर हमास नरम पडला आहे. हमासच्या नेत्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. हमासचे नेते इस्माईल हनीये यांनी सोमवारी कतार आणि इजिप्तला त्यांची पॅलेस्टिनी संघटना युद्धविराम प्रस्ताव स्वीकारण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. गाझामध्ये युद्धबंदीसाठी इस्रायल आणि हमासमध्ये कतार आणि इजिप्त मध्यस्थी करत असून इजिप्तची राजधानी कैरो येथे याबाबत चर्चा सुरू होती.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये वाचवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

इस्त्रायली सैन्याने पॅलेस्टिनींना गाझा येथील रफाह शहर रिकामे कारंयस संगितले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पॅलेस्टिनीं आसरा घेतला आहे. यानंतर मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी नागरिक जिवाच्या भीतीने आपली घरे सोडून निघून जाऊ लागली आहे. इस्रायलने रफाहच्या सीमेवर रणगाडे उभे केले आहेत. त्याचवेळी हमासने इस्रायलला धमकी ही दिली होती. याआधीही हमासने इजिप्तमध्ये युद्धविराम प्रस्ताव स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, हमासने शालोम क्रॉसिंगवर हल्ला केल्याने युद्धविरामाची चर्चा इस्रायलने फेटाळली होती. हमासच्या हल्ल्यात चार इस्रायली सैनिक ठार झाले होते.

Supriya Sule : आता हे काय नवीन? बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी

हमासने युद्धविराम करार स्वीकारण्याच्या मुद्द्यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, हमास ज्या कराराबद्दल बोलत आहे त्याला इस्रायलची मान्यता नाही. हमास जर इस्रायलच्या अटी मान्य करण्यास तयार नसेल तर अशा स्थितीत रफाहमधील हल्ले थांबणार नाही. रफाहमध्ये इस्रायल लष्कराच्या कारवाया सुरूच राहतील असेही नेतन्याहू म्हणाले.

Lok Sabha Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, शरद पवार आदी नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

हमासचे राजकीय ब्युरोचे प्रमुख इस्माइल हनीये यांनी कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी आणि इजिप्तचे गुप्तचर मंत्री अब्बास कमाल यांना सांगितले की, हमास युद्धविराम कराराचा प्रस्ताव स्वीकारण्यास तयार आहे. राफाच्या लोकांना सोमवारपूर्वी निघून जाण्याचे आदेश इस्रायलने दिले होते. इस्त्रायली लष्कराने म्हटले होते की पॅलेस्टिनींनी अल मवासीमध्ये तयार केलेल्या सुरक्षित भागात जावे, जेणेकरुन रफाहमध्ये कारवाई करताना ते सुरक्षित राहतील.

इस्रायलने रफाह रिकामे करण्यास सांगितले होते. मात्र, अमेरिकेने इस्रायलच्या या भूमिकेला समर्थन दिले नाही. गाझामधील दक्षिणेकडील रफाह शहर रिकामे करण्यासाठी तसेच निर्वासितांना आधार देण्यासाठी कोणतीही योजना तयार करण्यात आलेली नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. पॅलेस्टाईनच्या गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत ३४,७०० लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ७८००० लोक जखमी झाले आहेत. ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायल हमस युद्ध सुरू झाले. हमासच्या हल्ल्यात १२०० इस्रायली नागरिक मारले गेले तर हमासने ३५३ लोकांना ओलीस ठेवले होते.

पुढील बातम्या