मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gold Silver Price Today: सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Gold Silver Price Today: सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Sep 02, 2022 08:11 AM IST

Gold Silver Price on 2 September 2022: सोने-चांदीच्या किमतीमध्ये नेहमीच चढ-उतार दिसून येतात. जाणून घ्या देशातील मुख्य शहरातील आजचा भाव.

आजचा सोने-चांदीचा भाव
आजचा सोने-चांदीचा भाव (Reuters)

Gold-Silver Price Today in India :गुंतवणूकदार, सवर्सामान्य माणूस सोन्याकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहतात. सोने-चांदी खरेदीपूर्वी या मौल्यवान धातूचे नवीन तर माहिती असणे गरजेचे आहे. यासाठीच जाणून घ्या आज काय भावाने सोने-चांदी विकली जाईल. सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात आज ५०० रुपयांनी बदल झालेला आहे. आज भारतात २२ कॅरेट सोन्याची सरासरी किंमत ४६,५०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,७३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. दुसरीकडे, चांदीची सरासरी किंमत ५१,६०० रुपये प्रति किलो झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचा दर

चेन्नई         : ४७,१०० (२२ कॅरेट), ५१,३८० (२४ कॅरेट)

मुंबई         : ४६,५०० (२२ कॅरेट), ५०,७३० (२४ कॅरेट)

दिल्ली       : ४६,७०० (२२ कॅरेट), ५०,९५० (२४ कॅरेट)

कोलकाता : ४६,५०० (२२ कॅरेट), ५०,७३० (२४ कॅरेट)

जयपूर       : ४६,७०० (२२ कॅरेट), ५०,९५० (२४ कॅरेट)

लखनऊ    : ४६,७०० ( २२ कॅरेट), ५०,९५० (२४ कॅरेट)

पाटणा       : ४६,५३० (२२ कॅरेट), ५०,७६० (२४ कॅरेट)

पुणे            : ४६,५३० (२२ कॅरेट), ५०,७६० (२४ कॅरेट)

नागपूर       : ४६,५३० (२२ कॅरेट), ५०,७६० (२४ कॅरेट)

नाशिक       : ४६,५३० ( २२ कॅरेट), ५०,७६० (२४ कॅरेट)

चांदीची आजची किंमत

आज चांदीच्या किंमतीत मोठा बदल झाला आहे आणि सरासरी किंमत ५४,००० रुपये प्रति किलो आहे. प्रमुख शहरांबद्दल बोलायचे झाल्यास मुंबई, दिल्ली, लखनऊ आणि पटना मध्येही किंमत ५१,६०० रुपये प्रति किलो आहे तर चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, विजयवाडा इत्यादी दक्षिणेकडील शहरांमध्ये किंमत ५८,००० रुपये प्रति किलो आहे.

(सोन्या-चांदीच्या दिलेल्या किमती सूचक आहेत. यात जीएसटी किंवा इतर कोणत्याही कराचा समावेश नाही.)

‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

१. सोन्याच्या दागिन्यांमध्ये, ज्वेलर्स स्वतंत्रपणे मेकिंग चार्जेस आकारतात. खरेदी करताना ही माहिती आवर्जून घ्या.

२. खरेदी करताना रिटर्न पॉलिसीबद्दल माहिती घ्या.

३. सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग कायद्याने बंधनकारक आहे. खरेदी करताना हॉलमार्किंगची खात्री करा. हॉलमार्किंग गुणवत्ता आणि शुद्धतेची हमी देते.

IPL_Entry_Point

विभाग