मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  SC : तुम्ही कोण?; शिवसेना भवनवर दावा सांगणारी याचिका फेटाळाताना कोर्टाने याचिकाकर्त्याला झापले

SC : तुम्ही कोण?; शिवसेना भवनवर दावा सांगणारी याचिका फेटाळाताना कोर्टाने याचिकाकर्त्याला झापले

Apr 28, 2023, 01:05 PM IST

  • Supreme Court on Ashish Giri Plea : मूळ शिवसेनेची सर्व स्थावर व जंगम मालमत्ता एकनाथ शिंदे गटाकडं हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

Uddhav Thackeray - Eknath Shinde

Supreme Court on Ashish Giri Plea : मूळ शिवसेनेची सर्व स्थावर व जंगम मालमत्ता एकनाथ शिंदे गटाकडं हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

  • Supreme Court on Ashish Giri Plea : मूळ शिवसेनेची सर्व स्थावर व जंगम मालमत्ता एकनाथ शिंदे गटाकडं हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

Supreme Court on Ashish Giri Plea : शिवसेना भवनसह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या ताब्यात असलेल्या शाखा व अन्य मालमत्तांवर दावा सांगणारी एका वकिलाची याचिका सर्वोच्च न्यायालयानं क्षणाचाही विलंब न लावता फेटाळली आहे. तुम्ही याचिका करणारे कोण?, असा सवाल करत कोर्टानं संबंधित याचिकाकर्त्याला झापलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

UP Mobile Blast News: ईअरफोन लावून बाईक चालवत होती महिला, तितक्यात मोबाईलचा स्फोट झाला अन्...

UP : उत्तर पत्रिकेत 'जय श्रीराम' आणि क्रिकेटपटूंची नावं लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना पास केलं; प्राध्यापकांची हकालपट्टी

Viral News : मैत्रिणीसाठी ऑर्डर केलेला बर्गर मित्राने अर्धा खाल्ला; संतापलेल्या दोस्ताने केली हत्या

Patna Hotels Fire: पाटणा रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल्सना भीषण आग, ६ जणांचा होरपळून मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मूळ शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक आमदार व खासदार त्यांच्यासोबत गेले. त्यानंतर मूळ पक्ष कुणाचा हा वाद निवडणूक आयोगापर्यंत गेला. लोकप्रतिनिधींची संख्या व अन्य काही बाबींच्या आधारावर निवडणूक आयोगानं मूळ पक्षाचं नाव व चिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केलं. त्यामुळं शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय व शिवसेनेच्या राज्यभरातील शाखा कुणाच्या ताब्यात जाणार याविषयी चर्चा रंगली होती. त्यावरून राजकीय राडे होण्याचीही शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आम्ही शिवसेना भवनवर दावा सांगणार नसल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं.

Uddhav Thackeray : स्वत: जागा सुचवूनही आता बारसू रिफायनरीला विरोध का?; उद्धव ठाकरेंनी केला खुलासा

शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतरही मुंबईतील एक वकील आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत ठाकरे गटाच्या ताब्यातील सर्व स्थावर, जंगम मालमत्ता व पक्ष निधी शिंदे गटाला देण्याची विनंती केली होती. पक्षाची मालमत्ता व निधीवर कोणा एकाचा अधिकार नसतो. निवडणूक आयोगानं अधिकृत पक्ष एकनाथ शिंदे यांच्या गटाचा असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळं पक्षाची मालमत्ता व निधी त्यांना मिळावा, असं गिरी यांनी याचिकेत म्हटलं होतं. मात्र, या याचिकेशी आपला संबंध नसल्याचं शिंदे गटानं स्पष्ट केलं होतं.

सरन्यायाधीस डी. वाय. चंद्रचूड यांच्यासमोर हे प्रकरण आले असता सुनावणी न घेताच त्यांनी ही याचिका फेटाळून लावली. 'शिंदे गटासाठी याचिका करणारे तुम्ही कोण आहात? आम्ही यावर कुठलाही आदेश देणार नाही, असं म्हणत चंद्रचूड यांनी ही याचिका फेटाळून लावली.