मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  शाओमी रेडमीच्या मोबाईल स्फोट; महिलेचा मृत्यू झाल्याच्या दाव्यावर कंपनी म्हणते, आम्ही…

शाओमी रेडमीच्या मोबाईल स्फोट; महिलेचा मृत्यू झाल्याच्या दाव्यावर कंपनी म्हणते, आम्ही…

Sep 12, 2022, 08:38 PM IST

    • Redmi 6A Blast: मोबाईलच्या स्फोटामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा युट्यूबरने केल्यानंतर यावर कंपनीकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
मोबाईलच्या स्फोटामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा युट्यूबरचा दावा

Redmi 6A Blast: मोबाईलच्या स्फोटामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा युट्यूबरने केल्यानंतर यावर कंपनीकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

    • Redmi 6A Blast: मोबाईलच्या स्फोटामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा युट्यूबरने केल्यानंतर यावर कंपनीकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

Redmi 6A Blast: स्मार्टफोनला आग लागणं किंवा स्फोट होण्याच्या घटना आता कमी समोर येतात, पण जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा त्याची चर्चा होते. आता शाओमीच्या एका फोनचा स्फोट झाल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा एका युट्यूबरने केला आहे. मंजित असं युट्यूबरचं नाव असून त्याने म्हटलं की, उशीखाली फोन ठेवून झोपलेल्या महिलेचा मृत्यू शाओमी रेडमी ६ए फोनच्या स्फोटामुळे झाला. कंपनीनेसुद्धा या आरोपावर प्रतिक्रिया दिली असून प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Cyber Crime : मोठ्या फ्रॉडचा धोका, गुगलने घातली 'या' ॲप्सवर बंदी! गुरुग्राम पोलिसांनी पाठवली होती नोटीस

झारखंडमध्ये सूर्य देवाचा प्रकोप! तापमान पोहोचले ४७ अंश सेल्सिअसवर, २ बेशुद्ध, एकाचा मृत्यू, हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १ मे रोजी अयोध्या दौऱ्यावर; रामलल्ला दर्शन, शरयू पूजन, असा आहे संपूर्ण कार्यक्रम!

Naxalite Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, तीन महिलांसह १० नक्षलवाद्यांचा खात्मा

एमडी टॉक वायटी असं युट्यूब चॅनल असलेल्या मंजितने आपल्या ट्विटरवर फोनच्या ब्लास्टनंतरचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये फोन पूर्णपणे जळाल्याचं दिसून येतं. तसंच महिलेच्या चेहऱ्याजवळ फोन ठेवला होता, त्याचा स्फोट झाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे. दिल्लीच्या एनसीआरमध्ये ही घटना घडली आहे.

मंजितने गेल्या आठवड्यात स्फोटानंतर रेडमी ६ए फोन आणि महिलेचा फोटो शेअर करत ट्विट केलं होतं. त्यात म्हटलं की, रेडमी ६ए चा वापर त्या करत होत्या. त्या झोपल्या असताना फोन चेहऱ्याच्या जवळ ठेवला होता. तो काही वेळाने स्फोट होऊन फुटला. आता ही कंपनीची जबाबदारी आहे आणि त्यांनी सपोर्ट करायला हवं.

युट्यूबरने आणखी एक ट्विट करून म्हटलं की, कुटुंब सामान्य असं असून त्यांचा मुलगा भारतीय सैन्यात आहे. त्यांना याबाबत जास्ती माहिती नव्हतं. फक्त फोन करणं आणि युट्यूब पाहणं एवढ्यासाठीच फोनचा वापर करत होत्या. आता तुमचा ब्रँड चूक मान्य करत नाहीय, जबाबदारी घेत नाही, एका कुटुंबाला न्यायासाठी लढावं लागतंय याचा अर्थ काय? असा प्रश्नही विचारला आहे.

दरम्यान, शाओमी इंडियाकडून यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, शाओमीच्या ग्राहकांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. अशी प्रकरणे आम्ही गांभीर्याने घेत आहे. सध्या आमची टीम संबंदित कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. आता या स्फोटाचं कारण शोधण्याचं काम टीम करत आहे.

विभाग