मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Retail Inflation: खाण्यापिण्याच्या वस्तूंची महागाई वाढली, ऑगस्टमध्ये पोहचली ७ टक्क्यांवर

Retail Inflation: खाण्यापिण्याच्या वस्तूंची महागाई वाढली, ऑगस्टमध्ये पोहचली ७ टक्क्यांवर

Sep 12, 2022, 07:52 PM IST

    • Retail Inflation: गेल्या तीन महिन्यात किरकोळ महागाई दरात घसरण झाली होती, मात्र ऑगस्टमध्ये यात वाढ झाली आहे. सरकारकडून याबाबतची आकडेवारी जारी करण्यात आली आहे.
किरकोळ महागाई दरात वाढ

Retail Inflation: गेल्या तीन महिन्यात किरकोळ महागाई दरात घसरण झाली होती, मात्र ऑगस्टमध्ये यात वाढ झाली आहे. सरकारकडून याबाबतची आकडेवारी जारी करण्यात आली आहे.

    • Retail Inflation: गेल्या तीन महिन्यात किरकोळ महागाई दरात घसरण झाली होती, मात्र ऑगस्टमध्ये यात वाढ झाली आहे. सरकारकडून याबाबतची आकडेवारी जारी करण्यात आली आहे.

Retail Inflation: गेल्या तीन महिन्यात किरकोळ महागाईत घसरण दिसून आली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात यामध्ये वाढ झाली आहे. भारतात किरकोळ महागाई दर ऑगस्ट महिन्यात ७ टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलै महिन्यात हाच दर ६.७१ टक्के इतका होता. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दर ५.३ टक्के होता. किरकोळ महागाई गेल्या ८ महिन्यांपासून आरबीआयने निश्चित केलेल्या ६ टक्के ध्येयापेक्षा वरच आहे. पाच महिन्यात फक्त दोन वेळा ७ टक्क्यांपेक्षा ही महागाई कमी झाली होती.

ट्रेंडिंग न्यूज

RTOमध्ये जाऊन आता वाहन परवण्यासाठी परीक्षा देण्याची गरज नाही; ड्रायव्हिंग लायसन्ससाठी सरकारची नवी नियमावली

Jodhpur Black Magic: घरगुती वादातून मुक्तता मिळविण्यासाठी तांत्रिकाशी संपर्क साधला, आयुष्यभराची कमाई झटक्यात गमावली!

Viral News : पिस्तुल घेऊन व्हिडिओ बनवत होता १७ वर्षीय रॅपर, गोळी झाडली गेल्याने अचानक मृत्यू

Viral Video : आंबा पाण्यात न भिजवता खाताय? लगेच सावध व्हा! हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल!

सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, अन्न महागाई ऑगस्ट महिन्यात ७.६२ टक्के होती, त्याआधी जुलै महिन्यात ६.६९ टक्के, तर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ३.११ टक्क्यांवर होती. सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतात यावर्षी जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादनात २.४ टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षी हेच प्रमाण ११.५ टक्के इतकं होतं.

देशाच्या औद्योगिक उत्पादनात जुलै महिन्यात २.४ टक्क्यांची वाढ दिसून आली. एक वर्षापूर्वी जुलै २०२१ मध्ये हीच वाढ ११.५ टक्के इतकी होती. एनएसओकडून यासंदर्भात आकडेवारी जारी करम्यात आली आहे. यानुसार जुलै २०२२ मध्ये मॅन्युफॅक्चरिंग विभागातील उत्पादनात ३.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय खाण उत्पादनात जुलैमध्ये ३.३ टक्के घसरण झाली, तर वीज निर्मितीत २.३ टक्क्यांची वाढ झाली. एप्रिल २०२२ मध्ये कोरोनामुळे औद्योगिक उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे तब्बल ५७.३ टक्के इतकी घसरण झाली होती.

गहू, तांदूळ, डाळ यांसारख्या आवश्यक धान्यांच्या किंमतीत वाढ झाल्यानं महागाई दरावर परिणाम झाला. अनेक ठिकाणी देशभरात पावसाच्या कमी जास्त प्रमाणामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांचा समावेश आहे. तर काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

विभाग

पुढील बातम्या