मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rajbharti bapu suicide : महिलेशी असभ्य बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं साधूची आत्महत्या?

Rajbharti bapu suicide : महिलेशी असभ्य बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं साधूची आत्महत्या?

Jan 25, 2023, 12:12 PM IST

  • Junagadh Priest Rajbharti Bapu kills self over viral video : जुनागड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पूजाऱ्याने व्हायरल व्हिडिओमुळे स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

राजभारती बापू

Junagadh Priest Rajbharti Bapu kills self over viral video : जुनागड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पूजाऱ्याने व्हायरल व्हिडिओमुळे स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

  • Junagadh Priest Rajbharti Bapu kills self over viral video : जुनागड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पूजाऱ्याने व्हायरल व्हिडिओमुळे स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

समाज माध्यमांवर झालेली बदनामी सहन न झाल्याने, एका पूजाऱ्याने टोकाचे पाऊल उचलत स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना जुनागड जवळील खाडियाजवळील शेतात घडली. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.

ट्रेंडिंग न्यूज

उद्या NEET परीक्षा! शूजवर बंदी, काय आहे ड्रेस कोड, जाणून घ्या परीक्षा केंद्रावरील १० नियम

viral news : मुलासोबत शारीरिक संबंध ठेवणे महिला नेत्याला पडले महागात! पक्षातून हकालपट्टी

Nijjar Murder Case : कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतील तिघा संशयितांना अटक

Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, राजभारती बापू असे आत्महत्या केलेल्या पूजाऱ्याचे नाव आहे. जुनागड जवळील खाडियाजवळील शेतात त्याने टोकाचे पाऊल उचलत स्वत:च्या परवाना असलेल्या बंदुकीतून गोळी झाडत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

राजभारती बापू याचे काही दिवसांपूर्वी एका महिलेशी वाद झाला होता. या वेळी त्याने महिलेशी असभ्यपणे वर्तन केले. याचा व्हिडिओ काही जणांनी काढून तो व्हायरल केला. तसेच महिलेसोबतचा त्यांचा एक फोटोही व्हायरल झाला होता. या घटनेमुळे राजभारती नाराज होते. ते डिप्रेशनमध्ये गेले होते, यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

“आम्ही या घटनेच्या तपासासाठी एफएसएल टीम पाठवली आहे. आम्हाला समजले की हा व्यक्ती सोशल मीडियावर काही पोस्टमुळे नाराज होता. आम्हाला कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही पण आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताही ठोस पुरावा मिळाल्यास आम्ही गुन्हा नोंदवू,, अशी माहिती जुनागडचे डिसीपी हितेश धंधलिया यांनी दिली.

विभाग