मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  building collapsed : लखनौमध्ये पाच मजली इमारत कोसळली, २० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले

building collapsed : लखनौमध्ये पाच मजली इमारत कोसळली, २० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 25, 2023 12:24 AM IST

लखनौमध्ये पाच मजली इमारत कोसळल्याने २० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मदत व बचावकार्य सुरू आहे.

लखनौमध्ये पाच मजली इमारत कोसळली
लखनौमध्ये पाच मजली इमारत कोसळली

लखनौमध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मोठी दुर्घटना झाली. येथे पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळ्याने २० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. दोन तासाच्या मदत व बचाव कार्यानंतर १२ लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून अजून जवळपास आठ ते १० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. ही घटना हजरतगंजमधील वजीर हसन रोडवरील अलाया अपार्टमेंटमध्ये घडली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला आहे.

घटनास्थळी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि नगर विकास मंत्री एके शर्मा दाखल झाले आहेत. ब्रजेश पाठकयांनी सांगितले की, अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ मदत कार्यात गुंतले आहे. सांगितले जात आहे. या इमारतीच्या बेसमेंटमध्ये काही दिवसांपासून काहीतरी काम सुरू होते. मदत कार्यासाठी जेसीबीसह मोठ्या मशिनी बोलावण्यात आल्या आहेत.

 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या अपार्टमेंटमध्ये ३० ते ३५ कुटूंबे राहतात. घटनास्थळी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली आहे. तसेचरुग्णालये व ब्लड बँकांना अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे. ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या लोकांना केजीएमयू आणि बलरामपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ सोबत स्थानिक पोलीसही मदतकार्यात गुंतले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग