मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bangalore Flyover : तरुणानं उड्डाणपुलावरून फेकल्या हजारोंच्या नोटा; पैसे लुटण्यासाठी लोकांची धावपळ

Bangalore Flyover : तरुणानं उड्डाणपुलावरून फेकल्या हजारोंच्या नोटा; पैसे लुटण्यासाठी लोकांची धावपळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 24, 2023 05:14 PM IST

Bangalore Flyover CCTV Video : बंगळुरुत एका तरुणानं उड्डाणपुलावरून हजारोंच्या नोटांची उधळण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Bangalore Flyover Viral Video
Bangalore Flyover Viral Video (HT)

Bangalore Flyover Viral Video : गर्दीच्या ठिकाणी असलेल्या एका उड्डाणपुलावरून तरुणानं पिशवीतील हजारो रुपयांच्या नोटा खाली उधळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकच्या बंगळुरुत ही घटना घडली असून त्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उड्डाणपुलावरून तरुण हजारो रुपयांच्या नोटा खाली फेकत असल्यामुळं नोटा लुटण्यासाठी उड्डाणपुलाखाली जमावानं मोठी गर्दी केली होती. याशिवाय तरुणानं फेकलेल्या नोटा झेलण्यासाठी लोकांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्यामुळं पोलिसांनी या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करत गर्दी पांगवून नोटा फेकणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं आता बंगळुरुतील या विचित्र घटनेमुळं संपूर्ण देशभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकची राजधानी बंगळुरुत एका तरुणानं उड्डाणपुलावरून अचानक नव्याकोऱ्या नोटा खाली उधळायला सुरुवात केली. त्यामुळं आकाशातून नोटा पडत असल्याचं लक्षात येताच उपस्थितांनी पैसे लुटण्यासाठी मोठी धावपळ केली. तरुणानं फेकलेल्या नोटा झेलण्यासाठी उड्डाणपुलाखाली लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत नोटा फेकणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. अनेक लोकांनी तरुणानं फेकलेल्या नोटा घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

ज्यावेळी तरुण उड्डाणपुलावरून नोटा खाली फेकत होता त्यावेळी त्याच्या हातात पैशांची पिशवी होती आणि त्यानं गळ्यात मोठ्ठ घड्याळ लटकावलेलं होतं. तरुणानं १०, ५० आणि शंभर रुपयांच्या नोटा रस्त्यावर फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याशिवाय नोटा फेकणारा तरुण मानसिक रुग्ण असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

IPL_Entry_Point